"शिवाजीराव गिरधर पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
'''शिवाजीराव गिरधर पाटील''' (जन्म : इ.स. १९२५; मृत्यू : २२ जुलै, २०१७) हे एक मराठी राजकारणी होते.
 
शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते काँग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकार मंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली.
 
सहकार क्षेत्रात शिवाजीराव पाटलांनी भरीव कामगिरी केली. त्यांनी १९८२मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना केली. जागतिक ऊस व बीट साखर उत्पादक महासंघाचे अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात.