"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎आशय: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎वाचन संस्कृती: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २०:
बदलता वाचनव्यवहार :-
टी.व्ही, [[रेडिओ]] ,[[इंटरनेट]], फ़ेसबुक[[फेसबुक]], व्हॉट्‌सॲप, [[ट्विटर]] यांसारख्या आधुनिक प्रसारमाध्यमाच्या उपलब्धतेचा साहित्यव्यवहार आणि वाचनसंस्कृतीवर जाणवण्याइतपत परिणाम झाल्याचे दिसते. आधुनिक वाचकवर्ग या प्रसारमाध्यमाच्या विळख्यात सापडल्याने वाचन संस्कृतीवर काय चांगले वाईट परिणाम झाले हे बघणे गरजेचे आहे. सध्या वाचनव्यवहार लोप पावत चालला आहे, लोक वाचत नाहीत. मराठी [[पुस्तक|पुस्तकांना]] पहिल्यासारखा वाचक मिळत नाही . असा काहीसा ओरडा साहित्य व्यवहारात होताना दिसतो आहे. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावांमुळे पुस्तकांचा वाचक वर्ग दुरावला आहे. ओरडा विचारवंत, [[प्रकाशक]], [[लेखक]], [[पत्रकार]] मंडळींनी जो केला आहे. त्या ओरडण्यात कितपथ तथ्य आहे हे बघणे महत्त्वाचे आहे.
 
पूर्वीचा काळ असा होता की, पुस्तकाचे वाचन करणे, संग्रह करणे हे वैचारिक श्रीमंतीचे एक लक्षण समजले जाई. पुस्तकाचे आदान प्रदान केले जाई .कोणी कोणती पुस्तके वाचली, त्यांतून काय मिळाले, याविषयी आपसात चर्चा-वादविवाद व्हायचे. चांगल्या [[कथा]]‍-कादंबर्‍या [[कादंबरी|कादंबऱ्या]] या वाचताना वाचक एका भावनिक स्थितीत हरवला जायचा. [[काव्य]], कथा, नाट्य, प्रवासवर्णन, ललित, वैचारिक गद्य यांच्या वाचनाने रसिक वाचक आणखी समृद्ध होत जायचा. विविध ग्रंथप्रकाशने, [[नियतकालिक|नियतकालिके]], [[मासिक|मासिके]], वृत्तपत्रांच्या[[वृत्तपत्र|वृत्तपत्राच्या]] [[रविवार|रविवारच्या]] अंकातील साहित्यिक पुरवण्या यांवर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडायच्या. एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या सर्व आवृत्या रांगा लावून हातोहात खपल्या जायच्या असा तो वैभवाचा काळ.बघता बघता हा वाचनसंस्कृतीच्या वैभवाचा काळ लोप पावला .टी.व्ही, रेडिओ, इंटरनेट, डीव्हीडी, व्हीसीडी प्लेअर, सोशल मेडिया, फ़ेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम यांसारख्या आधुनिक करमणुकीच्या प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचक पुस्तके वाचेनासा झाला. रांगा लाऊन विकली जाणारी पुस्तके सवलत देऊनही विकली जात नसल्याच्या प्रकाशकांच्या ओरडण्यात तथ्य असल्याचे दिसते.
 
आधुनिक प्रसारमाध्यमांच्या प्रभावामुळे वाचक ग्रंथ वाचनापासून दुरावत का गेला? वाचन संस्कृतीचा लोप का झाला? या विधानांची चर्चा करताना वर उल्लेखलेल्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव तर परिकणामकारक आहेच पण याशिवाय आणखीही काही कारणे आहेत. पूर्वी करमणुकीच्या साधनांचा अभाव असल्यामूळे लोक फावल्या वेळेत ग्रंथवाचनाकडे वळत. मात्र सध्या करमणुकीच्या साधनाचा विकास झाला आहे. टी.व्ही. चॅनेल्सच्या वाढत्या संख्येमुळे लोकांना घरबसल्या जगाच्या कान्याकोपर्‍%यातली कोणत्याही विषयाची माहिती अत्यंत थोडक्या वेळात आणि परिणामकारक रीतीने मिळू लागली आहे. इंटरनेटवर ‘गुगल’सारख्या‘[[गुगल]]’सारख्या सर्च इंजिनाद्वारेइंजिनद्वारे घरबसल्या कोणत्याही विषयावरील माहिती काही सेकंदात मिळते. .आणि बघता बघता सारा समाज गुगलमय होत चालला आहे. तेव्हा तो [[ग्रंथालय|ग्रंथालयात]] जाऊन पुस्तकांची शोधाशोध करीलच कशासाठी? हाताचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण्याची समाजाची वृत्ती कधीच नसते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात एखादी गोष्ट मिळत असेल तर ती आजच्या फास्ट जगात कुणालाच नको असते. या सर्व गोष्टींच्या परिणामांमुळे वाचक वर्ग कमी होत चालला आहे. फेसबुक, व्हॉट्‌स‍ॲप ट्विटरर या प्रसार माध्यमांवर लोकांचा जास्त वेळ जात असल्याने वाचक वर्ग कमी होत चालला आहे.
 
वाचन संस्कृतीचा लोप होत आहे, असे म्हणताना लेखक-प्रकाशकांचीही काही नैतिक जबाबदारी असतेच. काळ बदलत चालला आहे. काळाच्या बदलत्या प्रवाहाबरोबर लेखक-प्रकाशकांनीही बदलायला हवे.सध्या इंटरनेट सारख्या माध्यमांचा चांगल्या प्रकारे वापर करून वाचन संस्कृती वाढवता येईल. इंटरनेट आदी गोष्टी हे वाचन संस्कृतीवर आक्रमण न मानता ती वाचन व्यवहाराला लाभलेली देणगी आहे या भावनेने तिचा वापर करून घेता येऊ शकेल. कारण ह्या आधुनिक प्रसार माध्यमाद्वारे गद्य-पद्य स्वरूपातील साहित्य, चित्रे, [[अनुदिनी]](ब्लॉग) प्रसिद्ध करता येईती.या दृष्टीने ही माध्यमे उपयुक्त ठरतील. मराठीत ई -साहित्य प्रतिष्ठान या संस्थेने पीडीएफ स्वरूपात मराठी पुस्तके विनामूल्य त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. ती पुस्तके आपण डाऊनलोड करून आपल्या [[मोबाईल|मोबाईलवर]] वाचू शकतो. पुस्तकांचा संग्रहही करू शकतो. इंटरनेट हे माध्यम पुस्तक प्रकाशनापेक्षा स्वस्त, जलद आणि प्रभावी माध्यम आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध केलेले साहित्य काही मिनिटात जगभरच्या वाचकांना उपलब्ध होऊ शकते. त्यावर चर्चा ,विचार, परिसंवाद करणे सहज शक्य होते. व्हॉट्‌स‍ॲपसारख्या प्रसारमाध्यमाद्वारे आपण पीडीएफ स्वरूपातील पुस्तकांचे आदान प्रधान करू शकतो. ही प्रक्रिया फार जलद गतीने करता येते.
 
==हिंदू संस्कृतीचे अन्य विषय==
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले