"आचार्य पार्वतीकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(पुरस्कार आणि सन्मान हा वेगळा विभाग केला)
==जीवनपट==
कोकणातील मालवणमधील कट्टा हे पार्वतीकुमार ह्यांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील महादेव कांबळी हे मुंबईत गिरणीत कामाला होते{{sfn|तारदाळकर|२०१२}}. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते.
===शिक्षण===
पार्वतीकुमार ह्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झाले{{sfn|पार्वतीकुमार|२०११}}. त्यांना नृत्याची स्वाभाविक आवड लहानपणापासून असली तरी शांताराम येरळकर ह्या त्यांच्या मित्रामुळे ते नृत्याकडे खऱ्या अर्थी वळले. येरळकरांनी त्यांना मुंबईतील परळ येथील संगीत नृत्य कलामंदिर येथे नेले आणि तेथे रतिकांत आर्य ह्यांच्याकडे त्यांनी कथक नृत्यशैलीचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला{{sfn|पार्वतीकुमार|२०११}}. कथक नृत्यशैली आत्मसात केल्यावर त्यासंदर्भातील शिकवण्या घेत असताना गिरगावातील देवधर संगीत-नृत्य-वर्गात कथकलीचे नृत्यगुरू कर्णाकर पण्णीकर ह्यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि पार्वतीकुमार कथकलीचे शिक्षण घेऊ लागले{{sfn|पार्वतीकुमार|२०११}}.