"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|जव्हार तालुका|जव्हार संस्थान}}
 
[[चित्र:Jaivilas Palace, Jawhar.jpg|250px|इवलेसे|जय विलास पॅलेस, जव्हार]]
[[चित्र:Jaivilas Palace from Hanuman Point, Jawhar.jpg|250px|इवलेसे|हनुमान पॉइंटपासून दिसणारा जय विलास पॅलेस]]
[[File:Kalmandvi_waterfall_jawhar-_2013-11-18_10-32.jpg|250px|thumbnail|काळमांडवी धबधबा.]]
 
महादेव कोळ्यांचे साम्राज्य (जयहर)
'''जव्हार संस्थान''' हे इसवी सन १३१६ पासून १० जून १९४८ पर्यंत अस्तित्वात होते. मुकणे गावातील जयदेवराव (जयबाजीराजे) हे क्षत्रिय महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबाजी जमीनदार होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी 31 लहान किल्ले जिंकले वर भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली.
 
इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबा आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले. इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.
 
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया, १ डिसेंबर १६६१ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला ''शिरपामाळ'' असे नाव पडले.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजीराजे वाडा तालुक्यातील कोहज गडावर मुक्कामी होते. विक्रमशहाराजे यांच्या पश्चात जव्हार संस्थानच्या गादीवर बसायचे कोणी, या कारणावरून वारसदारांमध्ये वादंग निर्माण झाले होते. या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप करून राणी सगुणाबाईंच्या अज्ञान पतंगशहा नावाच्या अज्ञान मुलाला गादीवर बसविले. मुलाच्या अधिपत्याखाली राणी सगुणाबाई याच राज्यकारभार चालवत असत. पुढे धुळबा राजाचा नातू देवबा यांच्या राजघराण्यातील गादीच्या वादामुळे जुना राजवाडा १८२०साली आगीत जळाला. यात राजवाड्यातील ऐतिहासिक कागदपत्रे जळून खाक झाली. हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता. जुन्या राजवाड्याचा परिसर २१ हजार चौरस मीटर होता.
 
जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर यांचे जावई स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. ते आपल्या सासुरवाडीला चिपळूणकरांच्या वाड्यात १९०१ ते १९०८च्या दरम्यान राहत होते. सावरकरांना अटक झाल्यावर चिपळूणकरांना जव्हारचा वाडा सोडून परागंदा व्हावे लागले. जव्हारचे रहिवाशी विष्णू उर्फ अप्पा महादेव वैद्य यांनी रत्नागिरी येथे तर रेवजी पांडू चौधरी यांनी पुणे येथे राहून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात खुद्द जव्हारमध्ये राहून ब्रिटिश राजवटीविरुद्ध कोणी आंदोलन केल्याचा इतिहास नाही. मुकणे राजघराणे नेहमी नेमस्त व तटस्थ राहत आले. त्यामुळे तुघलक, खिलजी, मोगल, पोर्तुगीज, मराठे ते इंग्रज राजवटीतही सुमारे सहाशे वर्षे त्यांचे राज्य टिकून राहिले. स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे म्हणून जी आंदोलने झाली त्यात जव्हार संस्थानही होते. जव्हार संस्थानचे विलिनीकरण लवकर व्हावे म्हणून २१-१-१९४८ रोजी मुंबईस सरदारगृहात तात्यासाहेब शिखरे, नाना कुंटे, भाऊसाहेब परांजपे, शामराव पाटील, दत्ता ताम्हाणे, वासुदेवराव करंदीकर व जव्हारचे मुकुंदराव संख्ये, केशवराव जोशी, रेवजी चौधरी, दत्तोबा तेंडुलकर अशा कार्यकर्त्यांची सभा होऊन 'जव्हार लोकसेवा संघ' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथूनच जव्हार विलिनीकरणाच्या लढ्यास प्रारंभ झाला. या लढ्याचे स्वरूप ध्यानात येताच जव्हारच्या महाराजांनी मुकुंदराव संख्ये, वासुदेव करंदीकर व दत्ताजी ताम्हाणे यांना जव्हारला बोलावून घेतले. हे तिघे आणि त्यांच्यासोबत केशवराव जोशी होते. या चौघांना अचानक अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यानंतर करंदीकर व संख्ये यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे सेक्रेटरी श्री. व्ही. पी. मेनन यांची दिनांक १७-३-१९४८ रोजी भेट घेऊन सर्व हकीकत त्यांच्या कानावर घातली. या लढ्यात राष्ट्रसेवादल व समाजवादी पार्टीचे कार्यकर्तेही सामील झाले होते. शेवटी दिनांक २०-३-१९४८ रोजी जव्हार संस्थान विलीन होत असल्याचे आकाशवाणीने जाहीर केले.
 
 
 
'''जव्हार संस्थान वैशिष्ट्ये'''
 
1)भारतातील सर्वात जुन्या संस्थानांपैकी एक संस्थान
 
2)बहुजनांची मोठी परंपरा असेलेले संस्थान
 
3)देशभक्ती असलेले येथील राजे आणि प्रजा
 
4)ब्रिटिश भारताततील एकमेव पिता-पुत्र राजांनी महायुद्धात सहभागी संस्थान-(नेटिव्ह इन्फट्री 8 बटालियन)
 
महाराज मार्तंडराव मुकणे (लेफ्टनंट-पहिले महायुद्ध)
 
महाराज यशवंतराव मुकणे(फ्लाईट लेफ्टनंट-दुसरे महायुद्ध)
 
5)भारताततील पहिले देवीची लस(मोफत) देणारे संस्थान
 
6)भारतातील सर्वात जास्त आरोग्य आणि शिक्षण यावर खर्च करणारे संस्थान
 
7)जगप्रसिद्ध वारली चित्रकला यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
 
8)लोकप्रिय तारपा वाद्य आणि नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेले संस्थान
 
9)महाराष्ट्रातील सर्वात जुने संस्थान, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध, कोकणातील थंड आणि जास्त पावसाचे ठिकाण
 
10)स्वखर्चाने धरण(जयसागर डॅम) बांधलेले भारतातील एकमेव संस्थान
 
11)ब्रिटिशांकीत जव्हार संस्थानास 9 तोफे यांची सलामी 3 स्थानिक(local) व 3 खासगी(personal)अश्या एकूण 15 तोफांची सलामी असलेले संस्थान
 
 
 
जव्हार''' हे शहर [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्या]]तील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. [[ठाणे]] शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ समजतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
 
 
जव्हारच्या किल्ल्यात मुकणे राजांचा एकमजली जुना राजवाडा आहे. राजवाड्यातील गादी व श्रीमंत दिग्विजयसिंह यांचे येथे तैलचित्र आहे. श्रीमंत महाराज यशवंतराव मार्तंड मुकणे राजे आणि गादीवर बसलेल्या राणी प्रियवंदा यांचे मोठे चित्र म्हणजे आपल्या मनातील मराठमोळ्या राजा-राणीला मिळालेले मूर्तस्वरूपच आहे. काळाच्या उदरात गडप होऊ पाहणारे किल्ल्याचे काही भग्न अवशेष व त्या भोवतालची तटबंदी, प्रवेशद्वार, बुरूज, मनोरे इत्यादी जुन्या वैभवाची साक्ष देतात
 
 
मुकणे राजांचा जो नवीन राजवाडा आहे तो एसटी स्टँडपासून दोन किमीवर आहे. जव्हारच्या एसटी स्टँडपासून रिक्षा केल्यास ती आपल्याला राजवाड्यापर्यंत घेऊन जाते. राजवाडा अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम व रचना पाहण्यासारखी आहे. आतली दालने, दरबार हॉल, छतावरील झुंबर, भिंतीवरील राजघराण्यांतील व्यक्तींची जुनी तैलचित्रे आणि इथला एकूण परिसर आपल्याला इतिहासकाळात घेऊन जातो. भोवताली अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
 
जव्हारची समुद्रसपाटीपासूनची उंची ५१८ मीटर आहे. येथे हिल स्टेशन आहे. हे नाशिकपासून ८० कि.मी.वर आणि मुंबईपासून १५० कि.मी.वर आहे. हे एक सुंदर व समुद्रसपाटीपासून उंचीवर असलेले एक नैसर्गिक शहर आहे. जव्हार मधील ९९ टक्के जनता आदिवासी आहे. जव्हारला ऐतिहासिक वारसा आहे. खूप सुंदर ठिकाण असल्याने मुंबई, ठाणे यासारख्या प्रदूषण जास्त असणाऱ्या ठिकाणच्या लोकांना हे ठिकाण विशेष आवडते.
 
जव्हारमध्ये काळमांडवी धबधबा, दाभोसा धबधबा खूप सुंदर आहे.जव्हारचा जय विलास पॅलेस हा राजवाडा एक ऐतिहासिक वारसा आहे तसेच सनसेट पाॅईॅंट,हनुमान पाॅईॅंट इत्यादी ठिकाणे बघण्यासाठी खास आहेत.
 
'''जव्हार राज्यातील किल्ले'''
 
1)भूपतगड (राजधानी)
2)गंभीरगड
3)अशेरीगड
4)कोहेज किल्ला
5)काळदुर्ग
6)टकमक किल्ला
7)तांदूळवाडी किल्ला
8)माहुलीगड
9)आसवगड
10)तारापूर चा किल्ला(जलदुर्ग)
11)कमानदुर्ग
12)बल्लाळगड
13)सेवागड
14)गुमतारा किल्ला
15)विवळवेढे किल्ला
16)सेगवा किल्ला
17)त्रंबकगड
18)हरिहरगड
19)भास्करगड
20)त्रिगलवाडी किल्ला
21)अलंग-कुलंन
22)मदनगड
23)भास्करगड
24)कान्हेहीदुर्ग
25)इंद्रागड
26)इगतपुरी चा किल्ला
27)पट्टागड
28)रांजणगिरी किल्ला
29)कमानदुर्ग
30)सिद्धगड
31)संजान किल्ला (जलदुर्ग)
32)किल्ले बेलापूर
 
===पर्यटन===
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले