"जयपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ३१:
[[चित्र:HawaMahalJeypore.jpg|thumb|left|जयपूरमधील [[हवामहाल]]]]
जयपूरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. [[एकोणविसावे शतक|एकोणविसाव्या शतकात]] जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत.
जयपूरमध्ये [[सिटी पॅलेस]], [[जंतर मंतर]], [[हवामहल]], [[अंबर महाल]], [[मुबारक महल]], [[जलमहल]], इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे. भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात (जयपूर-[[आग्रा]]-[[दिल्ली]]) जयपूर शहर मोडते. जयपूर हे शहर महाराजा [[दुसरे सवाई जयसिंह]] यांनी स्थापन केले. त्यांनी १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले तेव्हा त्यांची राजधानी [[अंबर, राजस्थान|अंबर]] होती. [[अंबर]] हे शहर आजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे. जयपूर चा [[आमेर किल्ला]] प्रसिद्ध आहे. सरोवराकाठी उभ्या असलेल्या या किल्ल्यावर मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे. किल्ल्याचे बांधकाम लाल वालुकाश्म आणि संगमरवरात करण्यात आलेले आहे. येथील शीशमहल हा महत्त्वाचा विभाग आहे. या किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे. येथील सुख निवासात पाण्याचे खुले कालवे बांधून त्या काळातही वातानुकूलनाची किमया साधण्यात आलेली होती. [[जयगड]] हा आमेर किल्ल्याच्या वरच्या बाजूला डोंगरावर असलेला किल्ला आहे. या किल्ल्यात खजिना दडवल्याचे सांगितले जात असे. आणिबाणीच्या काळात हा खजिना शोधण्यासाठी किल्ल्यात शोध मोहीमही राबविण्यात आली होती. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. खऱ्या अर्थाने जयगड या ठिकाणी तोफ निर्मिती केली जात असे. येथील जयवान ही त्या काळातील सर्वात मोठी कार्यक्षम आणि शक्तिशाली तोफ होती. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सवाई जयसिंग दुसऱ्यांनी उभारलेले जंतर-मंतर हे ठिकाण महत्त्वपूर्ण आहे. हे ठिकाण या काळातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देणारे आहे. अंतराळ विज्ञानाचा अभ्यास, काळ वेळेचे गणित, सूर्य-चंद्र आणि अन्य ग्रहांच्या हालचालींच्या नोंदी ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी देशभरात पाच ठिकाणी अशा रचना उभारल्या होत्या. त्यापैकीच ही एकमहत्त्वाची रचना आहे. जयपूर मधील हवामहल हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सवाई जयसिंग यांचे नातू [[सवाई प्रतापसिंग]] यांच्या काळात उभारण्यात आलेल्या या वास्तूची रचना [[लालचंद उस्ताद]] यांनी केली. या पाच मजली इमारतीत 953 झरोके आहेत. तिची रचना मधमाशांच्या पोळ्या प्रमाणे आहे. प्रत्येक झोक्यावर अप्रतिम नक्षीकाम करण्यात आलेले आहे. राजघराण्यातील स्त्रियांना बाहेरील घडामोडी पाहता याव्यात म्हणून झरोक्याची सोय करण्यात आलेली होती. त्यामुळे उत्तम वायुविजन होऊन आतील हवा थंड राहत असे. सिटी पॅलेस हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे 1949 पर्यंत जयपूरच्या महाराजांचे अधिकृत शासकीय केंद्र असलेल्या सिटी पॅलेस मध्ये आता महाराजा सवाई मानसिंग दुसरे यांचे [[संग्रहालय]] आहे. राजघराण्याचे वंशज आजही तेथे राहतात. जेव्हा राजा महालात असतो, तेव्हा महालावर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ध्वज फडकत असतो. औरंगजेबाने राजा जयसिंग यांना सवाई म्हणजेच इतर समकालीन राज्यकर्त्या पेक्षा अधिक शक्तिशाली म्हणून गौरविले होते. त्याचे प्रतीक म्हणून त्याच्या पूर्ण ध्वजाच्या वरच्या भागात त्यापेक्षा लहान आकाराचा आणखी एक ध्वज फडकत असतो. येथील अनेक वास्तूंचे सौंदर्य काळाच्या ओघात काहीसे नष्ट झालेली आहे. [[युनेस्को]]ने जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये स्थान दिल्यामुळे त्याला नवी झळाळी मिळण्याच्या आणि पर्यटनाला आणखी चालना मिळण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत.
 
== भूगोल ==
जयपूरमध्ये पावसाळ्यापासून प्रभावित गरम अर्ध-रखरखीत हवामान (कप्पेन हवामान वर्गीकरण बीएसएच) आहे .  जयपूर मध्ये लांब व  अत्यंत कडक उन्हाळा आणि लहान, सौम्य ते उबदार हिवाळा आहे. वार्षिक पर्जन्यमान ६३ सेमीपेक्षा जास्त आहे, बहुतेक जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाळ्यामुळे कमी होते आणि त्यामुळे मे आणि जूनच्या तुलनेत या दोन महिन्यांतील सरासरी तापमान कमी होते.पावसाळ्यात नेहमीच, मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे होतात, परंतु पूर येणे सामान्य नाही. मे महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ४८. ५ डिग्री सेल्सियस (119.3 ° फॅ) नोंदले गेले आहे . शहराचे सरासरी तापमान डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान २०  डिग्री सेल्सियस किंवा ६८ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी राहते. हे महिने कधीकधी थंड, सौम्य, कोरडे आणि आनंददायी असतात. आजपर्यंतचे सर्वात कमी तापमान −२.२ डिग्री सेल्सियस (२.0.० डिग्री सेल्सियस) नोंदले गेले आहे.जयपूर, जगातील इतर बड्या शहरांप्रमाणेच शहरी उष्णता बेटांचा एक महत्वाचा भाग आहे. ग्रामीण भागातील तापमान हे अधूनमधून हिवाळ्यातील अतिशीत तापमानापेक्षा कमी पडते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2021-02-20|title=Jaipur|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Jaipur&oldid=1007841445|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जयपूर" पासून हुडकले