"बंजारा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ९:
१. वाणिज्यकार :- ऋग्वेदात व्यापाराशी संबंध असणाऱ्या व्यक्तीस 'वाणिज्य' असे म्हटले आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती 'वाणिज्य' या संस्कृत शब्दापासून झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
गोर-बंजारा लोक पूर्वीच्या काळी कापडाचे तागे, अन्नधान्य, मीठ, मिरची व मसाल्यांचे पदार्थ, सैनिकांना रसद पुरविण्यासाठी अन्नधान्य इत्यादी पदार्थ पद्धतशीरपणे आपल्या बैलांच्या पाठीवर लादून भारतातील वेगवेगळ्या प्रांतात,वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवत असत व परत येताना नारळ, खजूर, केशर, यासारखा सुकामेवा व इतर जीवनावश्यक वस्तू आपल्या बैलांच्या पाठीवर लादून आणत असत. यालाच 'लदेणी' असे म्हणतात. 'लदेणी' म्हणजे गाई -
बैलांच्या पाठीवर गोण्यात सामान भरून लादणे.
 
'वाणिज्य' या संस्कृत शब्दासाठी हिंदी भाषेत 'बनज'असा शब्द प्रयोग आढळतो. 'बनज' म्हणजे व्यापार करणाऱ्यांस 'बनिज' असे संबोधले जाई. पुढे 'बनिज' या शब्दावरून 'बंजारा' हा शब्द रूढ झाला असावा असा युक्तिवाद केला जातो.
२. बनचर :- 'बंजारा' हा लोकवाचक शब्द 'बनचर' या हिंदी शब्दावरून रूढ झाला असावा असाही तर्क वर्तविला जातो. 'रानोमाळ भटकंती करणारा' या अर्थाने बंजारा शब्दाचा उर्दू भाषेतील अर्थ सुद्धा विचारात घेण्यासारखा आहे, असे गोर- बंजारा संस्कृतीचे अभ्यासक आत्माराम राठोड, डॉ.सुभाष राठोड म्हणतात. 'बंनचर' म्हणजे वनात वास्तव्य करणारा लोकसमूह.
 
बंजारा लोकगणाच्या संदर्भात एक बाब अशी दिसते की, गोर-बंजारांची लोकवस्ती आजही प्रामुख्याने डोंगराळ भागात डोंगर पायथ्याजवळ असल्याचे आढळून येते. डोंगराळ भाग निवडण्यामागे एक मुख्य कारण असे दिसते की गोर-बंजारांकडे मोठ्या प्रमाणात गुरे - ढोरे होती. त्यांना चारण्यासाठी ते वनाचा आसरा घेत असत. कालांतराने त्यांचा परंपरागत लदेणीचा व्यवसाय बंद पडल्याने ते जेथे होते तेथेच त्यांना स्थिरावणे भाग पडले असावे व 'बनचर' या शब्दाचे अपभ्रंश रूप 'बंजारा' असे झाले असावे. म्हणून 'बनचर' या शब्दापासून 'बंजारा' या शब्दाची उत्पत्ती झाली असावी हेही नाकारता येत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/बंजारा" पासून हुडकले