"कट्यार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१९४ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
लहान पाते आणि मजबूत पकड यामुळे एखादी ढाल फोडणे या शस्त्राने शक्य होत असे. कट्यार वापरून निर्णायक वार केले जाऊन शत्रूला ठार मारले जात असे. हातात असलेली कट्यार ठोसा मारावा तशी मारली जात असे. यामुळे शरीराची सर्व उर्जा कट्यारीमध्ये सामावली जाऊन प्रचंड ताकदीने ढाल ही फुटत असे. शक्य असल्यास वार करून जखमी करणे हे कार्य पण कट्यार करत असे. अर्थात हे शस्त्र हातघाईच्या लढाईच्या वेळी अत्यंत महत्त्वाचे होते. थंड डोक्याने नेमका वार करून मोक्याच्या क्षणी लढाई जिंकणे हे या शस्त्राने शक्य होत असे.
==चित्रण आणि महत्त्व==
ऐतिहासिक चित्रांमध्ये राजकुमार आणि सरदारांना कट्यार धारण केलेले चित्रित केले जात असे. कट्यार दाखवणे केवळ आत्म-बचावासाठी ही खबरदारी नव्हती तर समाजात उंचावलेले स्थान, आणि संपत्ती दाखवण्यासाठी कट्यार दाखवली जात असे. होते. कट्यारे वापरून [[राजपूत]] राजे अगदी वाघाची ही शिकार करीत. एखाद्या शिकारीसाठी अशा प्रकारच्या छोट्या-अंतराच्या शस्त्राने वाघाला ठार मारणे हे शौर्य आणि युद्ध कौशल्य यांचे निश्चित चिन्ह मानले जाते. कट्यार ही तूलनेने लहान असलयाने वागवणे सोपे होते. कायम सोबत ठेवता येते. मुठीच्या रचनेमुळे हातातून सुटणे अशक्य असते. त्यामुळे हे फार महत्त्वाचे शस्त्र होते. या खुबींमुळे या शस्त्राचा प्रसार व्हिएतनाम ते अफगाणिस्तान पर्यंत झालेला दिसून येतो.
[[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार होते असे म्हणतात. त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार असायची. मराठा साम्राज्यातही कट्यार शस्त्र मोठ्या प्रमाणात दिसून येते.
 
==हे ही पहा==
* [[बिचवा]]
* [[वाघनखे]]
* [[गुप्ती]]
* [[अंकुश]]
* [[खंजीर]]
* [[जंबिया]]
{{कॉमन्स वर्ग|Katar|{{लेखनाव}}}}
{{विस्तार}}
५,०४४

संपादने