"रितेश देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
ओळ ३३:
चित्रपटांसोबतच रितेश यांनी अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचलन देखील केले आहे. रितेश यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये नामांकन व पुरस्कार रितेश यांनी पटकावले आहेत.
 
अभिनयाशिवाय, सेलेब्रिटि [[क्रिकेट]] लीग मधील 'वीर मराठी' नावाचा संघ त्यांचा आहे तसेच ते या संघाचे कर्णधार देखील आहेत.2018 ला लय भारी चित्रपट काम.
 
==जीवन==
रितेश यांचा जन्म [[लातूर]]मधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय अवजड उद्योग व विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री.[[विलासराव देशमुख]] व '''वैशाली देशमुख''' यांचे ते दुसरे सुपुत्र आहेत. रितेश यांचे ज्येष्ठ बंधू [[अमित देशमुख]] हे माजी राज्यमंत्री तथा [[लातूर]] शहराचे विद्यमान आमदार आहेत तसेच छोटे बंधू [[धीरज देशमुख]] हे लातूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य आहेत.
रितेश यांचे शालेय शिक्षण लातूर येथेच झाले आहे तसेच त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण जि.डी.सोमाणी मेमोरिअल स्कूल येथे झाले आहे. कमला रहेजा महाविद्यालय,[[मुंबई]] या महाविद्यालयातून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली.
२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या [[तुझे मेरी कसम]] चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या [[जेनेलिया डिसुझा]] यांना रितेश यांनी आयुष्याचा जोडीदार(पत्नी) म्हणून पसंत केले व २०१२ मध्ये हिंदू व ख्रिस्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार ते '''जेनेलिया''' यांच्या सोबत विवाहबद्ध झाले. '''जेनेलिया''' या अभिनेत्री असुन त्यांनी आजवर अनेक हिंदी व तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
रितेश यांच्या दोन्ही वहिनी [[आदिती घोरपडे]] ('''आदिती अमित देशमुख''') व [[दीपशिखा भगनानी]] ('''दीपशिखा धीरज देशमुख''') या देखील चित्रपटसृष्टीशी निगडीत आहेत. मोठ्या वहिनी आदिती यांनी हिंदी मालिकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे तर धाकट्या वहिनी दीपशिखा या स्वतः निर्मात्या असुन सुप्रसिद्ध निर्माते [[वासू भगनानी]] यांच्या त्या कन्या आहेत.