"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१६७ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
'''संत चोखामेळा''' (चोखोबा) (जन्म : अज्ञात वर्ष; मृत्यू : [[इ.स. १३३८]]) हे [[यादव काळ|यादव काळातील]] [[नामदेव|नामदेवांच्या]] संतमेळ्यातील [[वारकरी]] संतकवी होते. चोखोबांचा जन्म [[विदर्भ]]ातील [[बुलढाणा]] जिल्ह्यात [[देऊळगाव राजा]] तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने [[महार]] होते. (चोखोबांचा जन्म [[पंढरपूर]]ला झाल्याचे [[महिपती ताहराबादकर|संत महिपती]] सांगतात.
[[चित्र:Sant Chokhamela.jpg|अल्ट=श्री संत चोखामेळा|इवलेसे|श्री संत चोखामेळा]]
 
चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व [[पंढरपूर|पंढरपूरला]] विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
 
५,०४४

संपादने