"सरस्वती महाल ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 4 langlinks, now provided by Wikidata on d:Q3135924
दुवे जोडले गेले
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''सरस्वती महाल ग्रंथालयाची''' स्थापना [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांचे]] वंशज [[सरफोजी महाराज दुसरे]] यांनी [[तंजावर]] येथे केली. हे ग्रंथालय संपूर्ण [[जग|जगातले]] मध्ययुगीन काळातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथालय मानले जाते. या ग्रंथालयात ४९,००० [[ग्रंथ]] आहेत आणि सुमारे ४६,००० [[हस्तलिखिते]] संग्रहित केलेली आहेत. त्यातील काही प्राचीन असून भूर्जपत्रांवर व ताडपत्रांवर लिहिलेली आहेत. त्यात मध्ययुगीन काळातील [[वाल्मिकी ऋषी|वाल्मीकी]] [[रामायण]], कंब रामायण व इतर पुरातन ग्रंथांच्या ताडपत्रावरील प्रति आहेत. कागदांवर लिहिलेल्या हस्तलिखितांमध्ये इसवी सन १४६८ मध्ये लिहिलेले भामती, भगवद्गीतेचे सर्वात लहान आकारातील हस्तलिखित, [[अंबर होसैनी]] या [[मुसलमान]] [[कवी|कवीने]] केलेले [[भगवद्‌गीता|भगवद्गीतेचे]] मराठी निवेदनाचे हस्तलिखित, तत्त्व चिंतामणी हा [[बंगाली लिपी|बंगाली लिपीतील]] संस्कृत ग्रंथ यांचा समावेश आहे.
 
==मराठी हस्तलिखिते==