"सांडपाणी शुद्धीकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1722203 by 2405:204:9710:CECE:2AC7:DDFD:3341:3B1 on 2019-12-17T02:52:14Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[File:Sewage treatment plant -Screening process 01.jpg|thumb|या प्रथम प्रक्रियेत सांडपाण्यातील घटक उदा. प्लास्टिक पिशव्या, लाकूड असे पदार्थ त्या जाळीमध्ये अडकून वेगळे होतात आणि पाणी पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.]]
[[चित्र:Sewage_treatment_plant_-Screening_process_02.jpg|इवलेसे|या प्रथम प्रक्रियेत सांडपाण्यातील घटक उदा. प्लास्टिक पिशव्या, लाकूड असे पदार्थ त्या जाळीमध्ये अडकून वेगळे होतात आणि पाणी पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.]]
 
जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात.

आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातून तयार होते. उदा: मलमूत्र विसर्जनाला वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage). अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage).
 
अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढीस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दूषित दुर्गंधी वायूंची निर्मिती होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतूंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होवू शकतात.
Line ८ ⟶ १०:
जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतूंना मोठ्या प्रमाणावर पोषक द्रव्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्रव्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सिजन पातळी मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते.
 
सांडपाणी शुद्धीकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठी होईल.
 
== प्रवाहमापन ==
सांडपाणी शुद्धिकरणामध्ये पहिली पायरी म्हणजे प्रवाहमापन. प्रवाह किती आहे व प्रदुषण पातळी किती आहे यावर ठरते की कोणते शुद्धिकरण तंत्रज्ञान वापरावे. प्रवाहमापन हे खरोखरीच मोजले जाते किंवा शक्य नसेल तर ठोकताळ्यांनुसार मापन केले जाते. नागरी वस्त्यांसाठी माणशी १०० लिटर प्रतिदिवस प्रवाह मानला जातो. परंतु या अंदाजात स्थानिक पाण्याचा वापर कसा आहे यावर अवलंबून असते. पुण्याचा माणशी पाण्याचा वापर हा २०० लिटरपेक्षाही जास्त आहे. त्याच वेळेस बार्शी व माण अश्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागात तो १०० लिटरपेक्षाही कमी आहे. म्हणून हा अंदाज हा वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावरून निश्चित केला जातो. तसेच नागरी वस्त्यांमध्ये घरगुती व सार्वजनिक वापरात बराच फरक असतो. तसेच औद्योगिक वापर हा पूर्णतः: वेगळ्या प्रकारे होत असल्याने प्रवाहमापनासाठी खालील प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे.