"भद्र मारुती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: भद्र मारुती मंदिर, हे खुलदाबाद (प्राचीन मूळ नाव भद्रावती) येथील ह...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

०६:०७, ६ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती

भद्र मारुती मंदिर, हे खुलदाबाद (प्राचीन मूळ नाव भद्रावती) येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे येथे सोयगाव येथे , जवळ औरंगाबाद,  महाराष्ट्र येथे स्थित आहे. हे मंदिर  वेरुळ लेण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थान हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील मारूती नवसाला पावणारा असून हे  अत्यंत जागृत असे स्थान आहे.

येथील मूर्ती शयनावस्थेत आहे. शयनावस्थेत असलेल्या हनुमहनाची अजून दोन ठिकाणे आहेत ती म्हणजे प्रयागराज येथील मंदिर व आणि तिसरे मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे. भद्रा मारुती मंदिर हे औरंगाबाद जवळील पर्यटकांचे एक आकर्षण मानले जाते. हनुमान जयंती आणि राम नवमी अशा शुभ प्रसंगी येथे लोक लाखोंच्या संख्येने जमा होतात.

कथा

भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता. हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे. एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असतांना त्यांना ही गाणी ऐकू आली. रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तीगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले. ते मंत्रमुग्ध झाले. आणि अनुमानाने एक भव्य योगमुद्रा मुद्रा धारण केली. त्याला 'भाव समाधी' असे म्हणतात ( भाव समाधी ही योगिक मुद्रा आहे). राजा भद्रसेनाने गाणे संपविले तेव्हा प्रत्यक्ष हनुमानाची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने नमस्कार हनुमानाला तेथे कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान राम भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली. अशा रितीने हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना स्शिर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे.