"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो आरोग्य
ओळ ६:
विमा व्यवसायाची सुरुवात लंडनमधल्या लाईट कॉफी हाऊसमधील व्यापाऱ्यांनी केली. या हाऊसमध्ये एकत्रित येणाऱ्या व्यापाऱ्यांनी जहाज वाहतुकीत असणारे धोके आणि मालाचे नुकसान यांवर भागीदारी करून कोणाचेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न केला.
 
भारतात विमा व्यवसायाची सुरुवात ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स को. लिमिटेड या कंपनीने केली. पण भारताची पहिली [[विमा]] कंपनी १८७० मध्ये मुंबईत ‘बॉम्बे म्युचुअल अश्युरंन्स सोसायटी लिमिटेड’ नावाने स्थापन झाली. त्यानंतर भारत इन्शुरन्स कंपनी १८९६ मध्ये दिल्लीत इम्पेरीअल इंपेरीअर ऑफ इंडिया १८९७ मध्ये मुंबईत, युनायटेड इंडिया चेन्नईत, नशनल इंडियन आणि हिंदुस्थान को – ऑपरेटिव्ह कलकत्ता आदि विमा कंपन्या आल्या.पुढे लाहोरमध्ये ‘को ऑपरेटिव्ह एश्युरन्स’ मुंबईत ‘बॉम्बे लाईफ’ ‘द इंडियन’ ‘न्यु इंडिया’ ‘द ज्युपिटर’ आणि दिल्लीत ‘द लक्ष्मी’ या कंपन्या आल्या.
 
१९५६ मध्ये विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण होऊन १ सप्टेंबर, १९५६ रोजी ‘[[भारतीय जीवन विमा निगम|लाईफ इन्शुरन्स कोऑपरेशन ऑफ इंडिया]]’ (एलआयसी) स्थापन झाले. परंतु ३१ ऑगस्ट २००७ पासून सोळा नवीन कंपन्यांना विमा व्यवसायाची परवानगी देण्यात आली. कार्याच्या दृष्टीकोनातून विमा संभाव्यतेच्या सिद्धांतावर आधारलेली अशी सहकारी व्यवस्था आहे की ज्यामध्ये सर्वांच्या सहयोगाने नुकसान भरपाई निमित्ताने एक धनसंचय निर्माण केला जातो आणि अनेक व्यक्तींच्या जोखमीचे वितरण सर्व समुदायामध्ये केले जाते.
ओळ १८:
मुदती विमायोजना या निव्वळ विमा योजना आहेत, म्हणजे, त्यांची रचना व किंमत अशा तऱ्हेने ठरवण्यात येते की खूप महत्त्वाची घटना घडल्यावर संबंधित व्यक्तीला पैसे देता यावेत म्हणून जणू काही योजनाधारक, एक गट म्हणून, त्यांचे हप्ते एकत्र करतात. यामुळेच अशी घटना घडल्यावर जो फायदा मिळू शकतो त्याच्या तुलनेत हे संरक्षण पुरवण्यासाठी प्रत्येक योजनाधारकाला येणारा खर्च अगदी बेताचा असतो. यात बचतीचा घटक नसल्याने जीवन विमा कंपनीला फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही.
 
सामान्यपणे कमी उत्पन्न, मोठ्या आथिर्क जबाबदाऱ्या, आर्थिकदृष्ट्या अवलंबून असणारा जोडीदार आणि मुले आणि विमा काढण्याजोगे चांगले [[आरोग्य]] या कारणांनी टर्म विमा निवडला जातो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास घरकर्ज व मुलांचे शिक्षण अशा जबाबदाऱ्यांपासून कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी टर्म योजना आदर्श ठरते. टर्म विमा खरेदी करण्याची आदर्श वेळ म्हणजे जेव्हा व्यक्तीवर कर्ज असते आणि ते ठरावीक कालावधीनंतर संपेल अशी अपेक्षा असते. त्याचप्रमाणे, वाहनकर्ज, अल्पावधी [[कर्ज]] इत्यादीपासून संरक्षण मिळवण्यासाठीही टर्म योजना घेता येते.
 
मुदती विमा ( टर्म योजना ) ही नावाप्रमाणेच, ठरावीक 'टर्म'साठी किंवा मुदतीसाठी असते. व्यक्तीची पसंती किंवा विमा संरक्षण मिळवण्याची गरज यावर अवलंबून ही मुदत ५ वर्षांपासून ते ३० वर्षांपर्यंत असू शकते.