"भूगोल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ७:
 
== भूगोलाचा इतिहास ==
भूगोलाचे अध्ययन [[प्राचीन ग्रीक संस्कृती]]मध्ये केलेले आढळते. ग्रीकांनी शास्त्र व [[तत्त्वज्ञान]] म्हणून भूगोलाचे अध्ययन केले आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचीन [[ग्रीक]] शास्त्रज्ञ [[ॲरिस्टॉटल|अ‍ॅरिस्टॉटल]]ने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व [[इरॅथोसिस]]ने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशेसुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अंशांमध्ये विभागून [[अक्षांक्ष]] व रेखांशाची कल्पना मांडली.
 
मध्ययुगाच्या काळात [[रोमन संस्कृती]] लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा [[युरोप]]कडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी (Idrisi), [[इब्न बतूत]], (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व [[बगदाद]] येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली.भूगोल बहुतेकदा दोन शाखांच्या रूपात परिभाषित केले जाते: मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल. मानवाचा भूगोल लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी आणि परस्परांशी त्यांचे स्थान आणि स्थान यांच्याशी आणि त्यातील संबंधांचा अभ्यास करून अभ्यासाशी संबंधित आहे. भौतिक भौगोलिक वातावरण, हायड्रोस्फीअर, बायोस्फीअर आणि भूगोल यासारख्या नैसर्गिक वातावरणामधील प्रक्रिया आणि नमुन्यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे.
 
सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये [[क्रिस्तोफर कोलंबस]], [[मार्को पोलो]] व [[जेम्स कूक]] यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने [[पॅरिस]] व [[बर्लिन]] विश्वविद्यालयांचा समावेश होता.
अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली [[रशियन]] जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली [[नॅशनल जियोग्राफिक सोसायटी]] यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डी ला ब्लैंचे यांनी योगदान दिले.
 
गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर संबंधित पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, [[प्रादेशिक भूगोल]], [[परिणामीय क्रांती]] (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), [[समालोचनात्मक भूगोल]] अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. [[भूगर्भशास्त्र]], [[वनस्पतिशास्त्र]], [[अर्थशास्त्र]], [[समाजशास्त्र]], [[जनसंख्याअध्ययनशास्त्र]] यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/भूगोल" पासून हुडकले