"शिवनेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ७०:
 
 
* महादेव कोळी चौथरा
शिवाजी महाराजांच्या पुणे परिसरातील कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मोगलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा. मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले. त्यांचे अतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमधे दोन शिलालेखदेखील आहेत. या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले.यात सरनाईकाच्या कुटूंबाला,नातेवाईकांना तसेच 52 मावळातील देशमुख/नाईकांना यांची धरपकड करून शिरछेद करण्यात आला. यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता. आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोघलांनी असे भयानक दुष्कृत्य केले. [२]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिवनेरी" पासून हुडकले