"विष्णूभटजी गोडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
दुवा सुधारला
ओळ ३२:
}}
 
'''विष्णूभटजी गोडसे''' हे '[[माझा प्रवास, (पुस्तक)|माझा प्रवास]]' या [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धकाळातील]] प्रवासानुभव कथणाऱ्या पुस्तकाचे लेखक होते. विष्णूभटजी मूळचे '[[वरसई]]' ([[पेण तालुका]], [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]]) येथील विद्वान होते. ते घरच्या गरिबीमुळे अर्थार्जनासाठी वरसई सोडून [[वाराणसी|काशीस]] गेले. प्रवासात दैववशाने [[झाशी]] येथे [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७ च्या उठावात]] सापडले. तेथे त्यांना [[झाशीची राणी लक्ष्मीबाई|झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा]] आश्रय लाभला. झाशीत आश्रयास असताना झाशीच्या किल्ल्याला पडलेल्या वेढ्यात सापडल्यामुळे उठावातील घडामोडी त्यांना प्रत्यक्ष पाहता आल्या. उठावातील प्रसंगांना तोंड देत खडतर प्रवास करत विष्णूभटजी अखेरीस वरसईस सुखरूप परतले. वरसईस परतल्यावर चिंतामणराव वैद्य यांच्या सांगण्यावरून विष्णूभटजींनी उठावाच्या हकिगती लिहून काढल्या आणि वैद्यांच्या ताब्यात दिल्या. [[इ.स. १९०६|१९०६]] मध्ये विष्णूभटजींचे देहावसान झाले. त्यांच्या मृत्युपश्चात्‌ [[इ.स. १९०७|१९०७]] साली चिंतामणराव वैद्यांनी त्यांचे लिखाण '[[माझा प्रवास, (पुस्तक)|माझा प्रवास]]' या नावाने [[पुणे|पुण्यात]] प्रसिद्ध केले.
 
==विविध आवृत्त्या==