"राजीव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
राजीव नाईक ह्याचे ‘लागलेली नाटकं’ हे नाटकाच्या बाजूने केलेले लेखन आहे. ‘बाजू घेणारं’ नव्हे, बाजूने केलेले. हे पुस्तक अनेकार्थांनी खुले, प्रसरणशील असण्याची अनेक कारणे आहेत. खुद्द लेखक अनेक वाटांनी नाटकाकडे येत राहिले आहेत. भाषावैज्ञानिक म्हणून, सौन्दर्यमीमांसक म्हणून, तत्त्वचिंतक म्हणून, नाट्यलेखक म्हणून, नाट्यशिक्षक म्हणून त्यांना नाटक अनेक अर्थांनी लागलेले आहे. म्हणून वाचकांसाठीही हा वाचनाच्या अनुभवाचा उलगडा करणारा, जुनीच नाटके नव्या उजेडात समजून घेण्याचा, आपल्याला देखील नाटके कशी लागतात हे तपासून बघावे असे वाटण्याचा प्रवास असतो.
 
राजीव नाईकांना प्रत्येक नाटकाचा ‘स्व’भाव कसा घडला हे शोधण्याची अपार जिज्ञासा आहे. त्यांच्या व्यक्तित्वात जे-जे म्हणून प्रगल्भपणे जाणवणारं आहे, ते-ते सारे पणाला लावून त्यांनी ‘लागलेली नाटकं’ उलगडलंय. प्रसंगी अत्यंत कठोरपणे बुद्धिप्रामाण्य अवलंबणारं, पण नाटकाचं ‘लागणं’ दाखवताना प्रसंगी विद्ध-अलवार झालेलं हे लेखन आहे. ह्या लेखनात जसा मिश्कीलपणा आहे तसाच भेदक तिरकसपणाही आहे. पुन्हा हे सारं परस्परात नीट विरघळलेलं, हट्टाने डोकं वर काढून विघ्न न आणणारं आहे. अंतिमतः समजून घेऊ पाहाणार्याला मदत करणारं आहे. अत्यंत संवादी, विश्वासार्ह आहे. कुठलंही चांगलं नाटक असंच असतं.मराठीत नाट्यविषयक लिखाण तसं विपूल आहे, पण बहुतेक सगळं नाट्यसंहितांची चिकित्सा करणारं, किंवा प्रयोगांच्या इतिहासाचा आढावा घेणारं. ‘नाटकातली चिन्ह’, ‘नाटकातलं मिथक’ ‘खेळ नाटकाचा’ आणि ‘ना नाटकाचा’ ह्या पुस्तकांमधून नाईकांनी शब्दसंहितेचं नाही तर नाट्यप्रयोगच्या घटकाचं सौंदर्य उलगडून दाखवणारं असं, खऱ्या अर्थानं रंगभूमीविषयक लिखाण केलं आहे. किंवा मराठीतल्या रंगभूमीविषय लिखाणाचा ओनामा त्यांनी केला आहे.
 
==राजीव नाईक यांची प्रकाशित पुस्तके==