"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५२:
 
मात्र राजवाड्यांच्या स्मृत्यर्थ प्रकाशित झालेल्या ब्राह्मण-पत्रिकेच्या '''राजवाडे तिलांजली अंकात''' वा. दा. मुंडले ह्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्यानुसार राजवाडे ह्यांनी मुंडल्यांना आपला जन्मशक १७८५ असा सांगितला होता. त्याबाबत मुंडले ह्यांनी पोतदार ह्यांच्याकडे विचारणा केली आणि राजवाड्यांचे थोरले बंधू वैजनाथपंत राजवाडे ह्यांच्याकडे त्यांना विचारणा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारणा केली असता राजवाडे ह्यांची एक जन्मपत्रिका वैजनाथपंत ह्यांनी पोतदारांना उपलब्ध करून दिली. ती मुंडले ह्यांच्या लेखात छापली असून त्यावर राजवाड्यांची जन्मतिथी आषाढ शु. ८, शके १७८५ अशी नोंदवलेली आहे{{sfn|मुंडले|१९२७|पृ. ८}}. इसवी सनानुसार हा दिनांक २४ जून १८६३ असा आहे{{sfn|मोडक|१८८९|पृ. ३३५}}. दत्तोपंत पोतदार ह्यांनीही नंतरच्या काळात ह्याच तिथीचा उल्लेख केलेला आढळतो {{sfn|पोतदार|१९६५|पृ. ७}}.
 
ह्याव्यतिरिक्त १२ जुलै १८६३{{sfn|खानोलकर|१९६३|पृ. ९१}} आणि २४ जुलै १८६३{{sfn|कुलकर्णी|२००७|पृ. ५१}} असे दोन दिनांक राजवाडे ह्यांचे जन्मदिनांक म्हणून नोंदवलेले आढळतात.
 
==राजवाड्यांचा दरारा==