"राजीव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''राजीव नाईक''' हे एक मराठी भाषेतील लेखक आहेत. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीला एकांकिका लिहिणारे राजीव नाईक यांच्या कथा ’अबकडई’, ’पूर्वा’, ’सत्यकथा’, ’हंस’ आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
 
राजीव नाईक ह्याचं ‘लागलेली नाटकं’ नाटकाच्या बाजूने केलेलं लेखन आहे. ‘बाजू घेणारं’ नव्हे, बाजूने केलेलं. हे पुस्तक अनेकार्थांनी खुलं, प्रसरणशील असण्याची अनेक कारणं आहेत. खुद्द लेखक अनेक वाटांनी नाटकाकडे येत राहिले आहेत. भाषावैद्न्यानिक म्हणून, सौन्दर्यमीमांसक म्हणून, तत्त्वचिंतक म्हणून, नाट्यलेखक म्हणून, नाट्यशिक्षक म्हणून त्यांना नाटक अनेक अर्थांनी लागलेले आहे. म्हणून वाचकांसाठीही हा वाचनाचा अनुभव उलगडे करणारा, जुनीच नाटकं नव्या उजेडात समजून घेण्याचा, आपल्याला देखील नाटकं कशी लागतात हे बघावं तपासून असं वाटण्याचा प्रवास असतो.
 
==राजीव नाईक यांची प्रकाशित पुस्तके==