"मंगेश पाडगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
(चर्चा | योगदान)
ओळ १६३:
एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता 'लिज्जत'ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, 'आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?' पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली. पावसाळ्यात पापडांची विक्री थोडी घसरत असल्याने लिज्जतलाही ही जाहिरात लाभदायी वाटली असावी. पुढच्या उन्हाळ्यात ते पाडगावकरांकडे गेले आणि हा क्रमच झाला. पापड, पाडगावकर, पाऊस आणि प्रायोजक (बडोदा बॅंक) यांची ही युती दीर्घकाळ टिकली.{{संदर्भ हवा}}
 
पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे बहुधा जूनच्या पहिल्या आठवड्यात रसिकांना मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरच्या लज्जतदार कवितेची ओढ लागू लागली. लिज्जत पापडाच्या जाहिरातीबरोबरच ही कविता छापली जायची. मंगेश पाडगावकरांच्या हस्ताक्षरांत छापलेल्या मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित होणार्‍याहोणाऱ्या या कवितेला साजेशी अशी निसर्गचित्राची प्रसन्न महिरप असे. कवितेच्या शेवटी पाडगावकरांची लफ्फेदार पण सर्व अक्षरे स्पष्ट दिसणारी स्वाक्षरी असे. दरवर्षी प्रकाशित होणारी ही कविता, पापडांची ही कल्पक जाहिरात आणि त्या जाहिरातीच्या आगे-मागे हजेरी लावणारा पाऊस यांची खेळीमेळीची, टपल्या मारणारी आणि खोड्या काढणारी चर्चा रंगत असे. पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.
 
===पाडगावकरांच्या काही नमुनेदार पाऊस-कविता===
ओळ १८६:
करुणेची संतत धार धरा ||
 
एखाद्या नव्याकोर्‍यानव्याकोऱ्या कवितेने सजलेल्या जाहिरातीने नवा ऋतू सुरू व्हावा, हे मराठीत प्रथमच घडत होते. पाडगावकरांच्या लेखणीने या कवितांपुरता विराम घेतल्यानंतर पुन्हा असा प्रयोग झाला नाही आणि पुन्हा तसा पाऊस पडला नाही.
 
==मंगेश पाडगावकरांचे काव्यवाचन==