"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
संदर्भ दिला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''मशरूम''' ही [[बुरशी]] गटातील [[वनस्पती]] आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.
 
निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने [[पूर्व आशिया]], [[तैवान]], [[चीन]], [[कोरिया]], [[इंडोनेशिया]] या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% [[युरोप]]ात, २७% [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेत]] व १४% पूर्व [[आशिया]] खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन [[जर्मनी]]मध्ये होते. <ref>{{संदर्भसंकेतस्थळ स्रोत|दुवा=https://udyojak.org/huge-opportunities-in-mashrum-sheti/|last=राजपूत|first=प्रतिभा|title=मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असलेली मशरूम शेती|date=३१ डिसेंबर २०१९|access-date=१४ जानेवारी २०२१}}</ref>
 
भारतामध्ये बटन मशरूम (''Agaricus bisporus''), शिंपला मशरूम (''pleurotus sp.'') व धानपेंढ्यांवरील Volvariella volvacea या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले