"वालचंद हिराचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ७:
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान, मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट कंपनी त्यांनी स्थापन केली. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
 
प्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स, सिंदिया एस्टिम शिप, रावळगाव शुगर फार्म, ऍक्रो इंडिया, बॉम्बे सायकल ऍण्ड मोटार, हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कुपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली. वालचंद हिराचंद यांच्या १२५ व्या जयंतीबरोबरच वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या शताब्दीस या महिन्यात प्रारंभ होत आहे.
 
==उल्लेखनीय==
*[[डिसेंबर २३]], [[इ.स. १९४०]] रोजी [[हिंदुस्तान एरक्राफ्ट लिमिटेड]] हा भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना तत्कालीन [[म्हैसूर राज्य|म्हैसूर राज्यात]] [[बँगलोर]] येथे त्यांनी सुरू केला. याच 'हिंदुस्थान एअरक्रॉफ्ट लिमिटेड' कंपनीचे पुढे [[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड]] असे नामांतर झाले. या कंपनीने आज भारतातील अत्याधुनिक विमानांच्या निर्मितीचे आणि निर्वाहाचे शिवधनुष्य उचलले आहे.