"वालचंद हिराचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[Image:Walchand Hirachand.jpg|right|thumb|सन्मानाप्रित्यर्थ प्रकाशित टपाल तिकीट]]
वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८८२ सोलापूर येथे झाला.
वालचंद यांचा शिक्षणापेक्षा व्यवसायाकडे कल असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले. वडिलांच्या आडत व्यवसायातही त्यांचे मन रमत नव्हते. ज्वारी व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती; मात्र ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले. बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ते या व्यवसायात उतरले. बार्शी लाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरवात करून सुमारे १४ वर्षे भागीदारीत अनेक ठिकाणी पुलांची उभारणी केली. एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रॅंच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली. मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदी व इरावती नदीवरील पूल बांधणी यांसह अनेक छोट्या- मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये आपल्यातील धडाडीचे दर्शन घडवले.