"बुरशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎उपयोग: छोटा बदल
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८:
बुरशीचा आढळ आणि विस्तार जवळजवळ सर्वत्र दिसून येतो. [[वाळवंट]], [[बर्फाच्छादित प्रदेश]], तसेच खोल [[समुद्र]] अशा प्रतिकूल परिस्थितीतही बुरशीची वाढ होते.
== उपयोग ==
बुरशीचा उपयोग मानवाला पुरातन काळापासून ज्ञात आहे. [[दारू]] बनवण्याची क्रिया पूर्णतः बुरशीच्या आंबण्यावर (Fermentation) अवलंबून असते. [[ब्रेड]] वा बेकरीचे पदार्थ बनवण्यासाठी [[यीस्ट]] वापरले जाते तो एक बुरशीचाच प्रकार आहे. [[औषध|औषधे]] बनवण्यासाठी बुरशीचा वापर होतो. [[अळंबीअळिंबी]] प्रकारातील बुरशी खाण्यासाठी वापरली जाते. ही बुरशी चवीला रुचकर असते. निसर्गातील क्लिष्ट घटकांचं विघटन करून जमिनीला पोषक द्रव्ये परत मिळवण्यास बुरशीची मोठी मदत आहे. [[अन्नसाखळीचे]] चक्र बुरशीमुळेच पूर्ण होते. निसर्गाच्या अन्नसाखळीत बुरशी सफाईकामगार म्हणून काम करते. टाकाऊ घटकांचे विघटन करण्याबरोबरच नैसर्गिक [[बीजारोपण]] प्रक्रियेत तिचा मोलाचा वाटा असतो. जंगलात, गवताळ प्रदेशात [[वनस्पती]] वाचण्यास बुरशीचा आधार असतो. वनस्पतींच्या बिया मातीमध्ये पडल्यानंतर हवेतील आर्द्रतेतून त्यांच्यावर बुरशीचे कवच तयार होते. बियांना आवश्यक असलेले [[प्रोटीन्स]]ही बुरशीच देते. पावसाळ्यात या बिया रुजतात आणि रोपे येतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीनेही बुरशी ही [[संजीवनी]] आहे. [[सर्दी]], तापापासून ते [[कर्करोग]], [[एड्स]] अशा गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे [[गुणधर्म]] या घटकामध्ये आहेत.
 
==औषधी उपयोग==
भारतातील आदिवासींना अनेक बुरशींचे गुणधर्म पूर्वजांकडून आलेल्या ज्ञानामुळे माहिती आहेत. हवामान बदलामुळे येणारा ताप, सर्दीखोकला, [[कावीळ]], पित्त अशा आजारांबरोबरच जखमी बरी करण्यासाठी, भाजलेले वण घालविण्यासाठी ते विविध प्रकारच्या बुरशींचा वापर करतात. लोणावळ्यात पावसाळ्यादरम्यान छोट्या बाजारपेठांमध्ये आदिवासी अळिंब ही बुरशी विक्रीसाठी ठेवतात. ही बुरशी चविष्ट असते. त्यामध्ये मुबलक प्रथिने असतात.गानोदेर्मा हि एक औशधि बुरशी आहे .या बुरशी पासून अनेक प्रकारची औशधे बाजारात उपलब्ध आहेत.किटकांवर वाढणारी कॉर्द्य्सिप्स हि बुरशी शक्तीसाठी भारी किमतीने विकली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/बुरशी" पासून हुडकले