"मकरंद साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
नव्वदोत्तर पिढीतील मकरंद साठे हे महत्त्वाचे नाटककारआहेत .हे केव्हाच अधोरेखित झाले आहे. १९८६-८७साली थिएटर अकॅडेमीने पुण्यात आयोजित केलेल्या नवनाटककार कार्यशाळेत साठे यांनी आपले चारशेकोटीविसरभोळे हे नाटक वाचले, तेव्हाच त्यांच्या वेगळ्या लेखनशैलीची चुणूक जाणकारांना दिसली होती. मानवी जगण्यातील असंगततेतून चिरंतन प्रश्नांचा शोधघेण्याचा त्यांचा प्रयत्न रोमनसाम्राज्याची पडझड, सापत्नेकराचं मूल, ठोंब्या, गोळायुगडॉटकॉम यानाटकांमधूनही दिसली. या अॅब्सर्डशैलीच्या नाटकांतूनच थेट सामाजिक वास्तवाला भिडणाऱ्या नाटकांकडे जाण्याची वाटही त्यांनीच निर्माणकेली. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे या टप्प्यावरचे त्यांचे महत्त्वाचे नाटक मानता येईल.
 
व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या ग्रीक तत्त्वज्ञ सॉक्रेटीसच्या सत्यान्वेषी जगण्याचा पाठ पुरावा करणारे हे नाटक त्यातील डॉ. श्रीराम लागू यांच्या भूमिकेमुळे विशेषत्वाने गाजले. त्यानंतर, पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक ज्यॅम झाल्यानंतर उद‍्भवलेल्या परिस्थितीचे चित्रण करणारे चौक हे रूपकात्मक नाटक आणि ते पुढे गेले हे शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाला वेगळ्याबाजूने भिडणारे नाटक अशा महत्त्वाच्या लेखनकृती साठेंनी-सिद्धकेल्याेसिद्ध केल्या आहेत.
 
एकीकडे नाटककार म्हणून लेखनाचे एक माध्यम हाताळत असतानाचदुसऱ्याबाजूने वैचारिक, चिंतनात्मक लेखन व त्याच्या घुसळणीतून निघालेल्या अच्युत आठवले आणि आठवण आणि ऑपरेशन यमू या कादंबऱ्या लिहून त्यांनी अन्य वाङ्मयप्रकारांतून आपले लेखकीय व्यक्तिमत्त्व अधिक विकसित केले. पेशाने आर्किटेक्ट असलेल्या साठेंचा पिंड चिंतनशील वाचक आणि लेखकाचा अधिक आहे. आजच्या काळातील मल्टिपल आयडेंटिटी क्रायसिसची विविधरूपे तपासणारे त्यांचे वेधक लेख याची साक्ष देतात. त्यांनी काही माहितीपटांचेही लेखन केले आहे. भोवतालच्या वास्तवात घडणाऱ्याराजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडी आणि त्याच वेळीत्याच वास्तवात जन्म घेणाऱ्या कलाकृती यांचे काही एक नाते असते, किंबहुनाते असले पाहिजे या गृहीतकातून मराठी रंगभूमीचा त्यांनी घेतलेला शोध हे त्यांच्या चिंतनशीलतेतून, चिकित्सकवृत्तीतून पडलेले पुढचे महत्त्वाचे पाऊल. त्यातूनच मराठी रंगभूमीच्या तीसरात्री हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिकवाटचालीचा दस्तावेज ठरावेअसे तीन खंडातील ग्रंथलेखन सिद्ध झाले आहे. मराठी साहित्यात ते वेगळे ठरणारे आहे.
 
==मकरंद साठे यांची पुस्तके==