"वैनगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
रचना
ओळ ३४:
वैनगंगेच्या वरच्या टप्प्याचे सुरुवातीचे काही पात्र खडकाळ असून त्यानंतर सिवनी जिल्ह्याच्या पूर्व सरहद्दीवर येईपर्यंतच्या तिच्या खोऱ्यात आलटून पालटून सुपीक गाळाचे प्रदेश व अरुंद दऱ्या आढळतात. पात्रात अनेक ठिकाणी द्रुतवाह (?), तसेच काठावर सुमारे ६० मी. उंचीच्या ग्रॅनाइटी खडकांच्या भिंती आढळतात. थानवर नदी मिळण्यापूर्वीचे वैनगंगेचे दहा किमी. लांबीचे खोरे निसर्गसुंदर आहे. मध्य भारतातील अशा अप्रतिम सृष्टिसौंदर्याच्या बाबतीत नर्मदेच्या भेडाघाट घळईनंतर याच खोऱ्याचा क्रमांक लागतो.
 
मध्य प्रदेश राज्यातून सुमारे २७४ किमीकि.मी. वाहत आल्यानंतर वैनगंगा मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्यांच्या सरहद्दीवरून ३२ किमी. नैर्ऋत्य दिशेकडे वाहत येते. त्यानंतर ती भंडारा व गोंदिया जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवर तिला पूर्वेकडून येणारी वाघ नदी मिळते.
 
भंडारा जिल्ह्यातून वाहताना ती प्रथम भंडारा-गोंदिया जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून व पुढे भंडारा तालुक्यातून नैर्ऋत्येस जाते. पुढे भंडारा-नागपूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस जाऊन भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागातून आग्नेयीस वळून गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून आग्नेयेस वाहत येते.
ओळ ४२:
वर्धा-वैनगंगा या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह पुढे प्राणहिता नावाने ओळखला जातो. प्राणहिता नदी महाराष्ट्र (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्यांच्या सरहद्दीवरून ११३ किमी. अंतर वाहत गेल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा गावाजवळच्या समद्र सपाटीपासून १०७ मी. उंचीवर पश्चिमेकडून वाहत येणाऱ्या गोदावरी नदीला मिळते.
 
बालाघाट, तुमसर, भंडारा व पौनी ही वैनगंगेच्या काठावरील प्रमुख नगरे आहेत. अंधारी , कथणी, कन्हान, खोब्रागडी, गाढवी, गायमुख, चुलबंद, चोरखमारा, पोटफोडी, फुअर, बावनथरी, बोदलकसा, वाघ, सुर या वैनगंगेच्या महाराष्ट्रातील प्रमुख उपनद्या आहेत. वैनगंगेचे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतील एकूण पाणलोट क्षेत्र ६१ हजार चौ. किमी. आहे.
 
सिवनी व छिंदवाडा जिल्ह्यांच्या विस्तृत प्रदेशातील तसेच नागपूर मैदानाच्या पूर्व भागातील पाणी पेंच व कन्हान नद्यांद्वारे वैनगंगेला मिळते. मध्य प्रदेशातील तिच्या खोऱ्यात दाट अरण्ये आहेत. सिवनी व बालाघाट जिल्ह्यांतील पात्रात बेसाल्टयुक्त खडकांच्या मालिका व खोल डोह आढळतात. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण बरेच कमी होते. बालाघाटनंतरचे पात्र सामान्यपणे रुंद व वालुकामय असून त्यात अधूनमधून खडकांच्या मालिका आढळतात.
ओळ ५०:
नदीने आपल्या खोऱ्यात काहीकाही ठिकाणी पूर-मैदानांचीही निर्मिती केली आहे. वैनगंगेचे खोरे तांदूळ उत्पादनासाठी विशेष महत्त्वाचे आहे. मात्र जलसिंचनासाठी तिचा विशेष उपयोग करून घेतलेला नाही. तिच्या खोऱ्यात लोकवस्ती विरळ आहे.
 
वैनगंगेच्या पहिल्या टप्प्यातील आश्चर्यकारक अशा दीर्घ अर्धवर्तुळाकार वळणाबद्दल व वेड्यावाकड्या पात्राबद्दल एक हिंदू आख्यायिका प्रचलित आहे.(कोणती?){{संदर्भ हवा}}
 
पहा: [[जिल्हावार नद्या]]