"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
 
== जीवन ==
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी [[इंग्रजी]] साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा=https://maharashtratimes.com/astro/dinvishesh/remembrance-of-freedom-fighter-literary-and-social-reformer-sane-guruji/articleshow/76314966.cms|title=मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र रचणारे थोर समाजसुधारक साने गुरुजी}} </ref>
 
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[अंमळनेर]] येथील [[प्रताप हायस्कूल]] येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, [[सेवावृत्ती]] शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.