"लाटेक्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्यासंदर्भत्रुटी_काढली
क्सेलाटेक्-ऐवजी झीलाटेक् हे योग्य लेखन वापरणे. मराठी आज्ञासंचाबाबत माहिती पुरवणे. देवनागरीतील लाटेक्-चे छोटे उदाहरण पुरवणे.
ओळ ९:
}}
 
'''लाटेक्''' (LaTexLaTeX) ही उच्चउत्कृष्ट दर्जाची अक्षरजुळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी आणि मुक्त आज्ञावलीच्या स्वरूपात उपलब्ध असलेली आज्ञावली आहे.{{sfn|An introduction to LaTeX}} ही आज्ञावली [https://www.latex-project.org/lppl/lppl-1-3c/ दि लाटेक् प्रोजेक्ट पब्लिक लायसन्स] ह्या मुक्त परवान्या-अंतर्गत वितरित करण्यात आली आहे. ह्या आज्ञावलीची पहिली आवृत्ती लेज्ली लॅम्पर्ट ह्यांनी १९८५ साली प्रकाशित केली असून ती डोनाल्ड नूथ (क्नूथ) ह्यांच्या टेक् (TeX) ह्या आज्ञावलीवर आधारित होती.
 
ह्या आज्ञावलीत साध्या पाठ्य (प्लेन टेक्स्ट) स्वरूपात मजकूर लिहिला जातो आणि अक्षरजुळणीच्या वैशिष्ट्यांसाठी मांडणीच्या खुणा (मार्क-अप टॅग) मजकुरात आवश्यक तिथे देण्यात येतात. ह्या साध्या पाठ्य (टेक्स्ट) धारिकेला .tex असा प्रत्यय जोडून ही धारिका संगणकावर साठवण्यात येते आणि मग लाटेक् ह्या आज्ञावलीद्वारे (लाटेक् इंजिनद्वारे) तिच्यावर प्रक्रिया होऊन मजकूर मांडलेल्या धारिकेच्या स्वरूपात (पीडीएफ धारिका) फलित मिळते.
 
==लाटेक्-मध्ये देवनागरी मजकूर==
लाटेक्-मध्ये देवनागरी लिपीचा वापर करता येतो. त्यासाठी फॉण्टस्पेक, बेबल, पॉलिग्लॉसिया ह्यांसारखे आज्ञासंच (लाटेक्-पॅकेज) वापरावे लागतात. तसेच प्रक्रिया करण्यासाठी क्सेलाटेक्लुआलाटेक् (LuaLaTeX) अथवा झी-लाटेक् (XeLaTeX) हीहे आज्ञावलीचालक (लाटेक्-इंजिन) वापरावे लागतेलागतात. ह्यांतील लुआ ह्या आधुनिक आज्ञावलीचा वापर लाटेक्-सह करण्यासाठी लुआलाटेक् हा आधुनिक चालक वापरणे कधीही अधिक फायदेशीर ठरते. झीलाटेक् हा चालक केवळ युनिकोड चिन्हांचा वापर लाटेक्-मध्ये करण्याकरिता उपयुक्त आहे. देवनागरी लिपीचे आधुनिक टंक वापरून लाटेक्-मध्ये देवनागरी अक्षरजुळणीही करता येते.
 
===मराठी आज्ञासंच===
 
२६ मे, २०२० पासून [https://ctan.org/pkg/marathi मराठी आज्ञासंच] सीटॅन (सेन्ट्रल टेक् आर्काईव्ह नेटवर्क) ह्या लाटेक्-च्या मुख्य संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. ह्या आज्ञासंचासह लाटेक्-मध्ये थेट मराठीतून लिहिण्याची व्यवस्था केली जाते, शिवाय मराठी भाषेच्या अक्षरजुळणीकरिता आवश्यक असणाऱ्या अनेक आज्ञा ह्या आज्ञासंचासह पुरवल्या जातात. ह्या आज्ञासंचासह मराठी लिहिणे अतिशय सुलभ झाले आहे. लाटेक् आज्ञावलीचे पुढील उदाहरण पाहा.
 
<syntaxhighlight lang="latex">
\documentclass{article}
\usepackage{marathi}
\title{शीर्षक} % ह्या आज्ञेच्या कार्यघटकात आपल्या लेखाचे शीर्षक लिहावे.
\author{लेखक} % ह्या आज्ञेच्या कार्यघटकात आपले नाव लिहावे.
 
\begin{document}
\maketitle % ह्या आज्ञेसह फलित धारिकेत शीर्षक छापले जाते.
 
नमस्कार! हा देवनागरी लिपीतील काही मजकूर आहे.
 
\textbf{हा मजकूर ठळक आहे} व \underline{ह्या मजकुरास अधोरेखित केले गेले आहे.}
\end{document}
</syntaxhighlight>
 
हे पाठ्य एका धारिकेत .tex (टेक्) ह्या प्रत्ययासह जतन करून लुआलाटेक् ह्या चालकासह चालवून पाहा.
 
लाटेक्-मधील आज्ञा "<code>\</code>" ह्या चिन्हाने सुरू होतात. आज्ञांचे आवश्यक कार्यघटक महिरपी कंसांत (<code>{</code>,<code>}</code>) लिहिले जातात. लाटेक् आज्ञावलीमध्ये "<code>%</code>" ह्या चिन्हानंतर लिहिला गेलेला मजकूर फलितात समाविष्ट होत नाही. आज्ञावलीय परिभाषेत ह्याला टिप्पणी (कमेन्ट) असे म्हटले जाते. अधिक तपशिलांत लाटेक् ही आज्ञावली शिकण्यासाठी लाटेक्-वितरणात समाविष्ट असलेली [https://www.ctan.org/pkg/latex-mr मराठी माहितीपुस्तिका] पाहा. ही पुस्तिका ग्नू-लिनक्स आधारित संगणकांवर वाचण्याकरिता कार्यपटलावर (टर्मिनलवर) पुढील आज्ञा चालवली जाते.
 
<syntaxhighlight lang="bash">
texdoc latex-mr
</syntaxhighlight>
 
ह्याचप्रमाणे मराठी आज्ञासंचाचे दस्तऐवजीकरणदेखील टेक्-वितरणात समाविष्ट आहे. ते पाहण्यासाठी पुढील आज्ञा कार्यपटलावर वापरा.
 
<syntaxhighlight lang="bash">
texdoc marathi
</syntaxhighlight>
 
===लाटेक्===
 
लाटेक् वापरून ग्रंथांच्या विविध आणि रंगीत रचना करणे शक्य आहे. ही आज्ञावली वापरून महाराष्ट्रातील एका लाटेक् गटाने काही पारंपारिक ग्रंथांच्या पुनर्मांडण्या केल्या आहेत.{{sfn|म. टा. खास प्रतिनिधी}}
Line २१ ⟶ ५६:
* लाटेक् आज्ञावलीचे [https://www.latex-project.org/ अधिकृत संकेतस्थळ]
* लाटेक् ही आज्ञावली मराठी व अन्य भारतीय भाषांसाठी कशी वापरावी ह्याविषयीची रोहित होळकर ह्यांची [https://www.ctan.org/pkg/latex-mr मराठी माहितीपुस्तिका]
* मराठी आज्ञासंचाचे [https://ctan.org/pkg/marathi अधिकृत पान]
* मराठी आज्ञासंचात सुधारणा सुचवण्यासाठीचे [https://gitlab.com/niranjanvikastambe/marathi/-/issues गिटपृष्ठ]
* लाटेक् वापरून पुनर्मांडणी केलेली मराठी पुस्तके [https://sites.google.com/site/latexmrbooks/pustake-utarava मराठी लाटेक् पुस्तकांचे संकेतस्थळ].
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लाटेक्" पासून हुडकले