"टॉलेमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भहीन लेख हा साचा जोडला
मजकूर मराठी विश्वकोशातून जसाच्या तसा घेतलेला आढळला. म्हणून तो काढून टाकला आहे.
खूणपताका: आशय-बदल
ओळ १:
'''क्लॉ़डियस टॉलेमी''' हा ग्रीक गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भूगोलाभ्यासक आणि फलज्योतिषीही होता.
{{संदर्भहीन लेख}}
(लॅटिन नाव क्लॉडियस टॉलेमस इ. स. सु. ९०–१६९). ग्रीक जोतिषशास्त्रज्ञ, गणिती, [[भूगोल]]<nowiki/>शास्त्रवेत्ते आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानी (निसर्गाचा सर्वसाधारण दृष्टिकोनातून विचार करणारा अभ्यासक). काहींच्या मते ते ॲलेक्झांड्रिया (ईजिप्त) येथे तर काहींच्या मते नाईल नदीवरील टॉलेमेइस हेर्मी येथे जन्मले. तथापि त्यांचे मुख्य कार्य ॲलेक्झांड्रिया येथेच घडले व तेथून जवळच एका देवळाच्या गच्चीवर त्यांची वेधशाळा होती.
 
त्यांच्या कालखंडाबद्दलही मतभेद आहेत. त्यांच्याविषयी व्यक्तिगत अशी इतर काहीही माहिती उपलब्ध नाही, परंतु त्यांच्या कार्याची मात्र पूर्ण माहिती सर्वत्र पोहोचल्यामुळे ते सर्वांत अधिक परिचित असे प्राचीन ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या बहुतेक ग्रंथांची मूळ ग्रीकमधून अरबी भाषेत व नंतर त्यावरून लॅटिनमध्ये रूपांतरे झाली. Megale Syntaxis Tes Astronomias हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे [[पुस्तक]] असून त्यात पूर्वीच्या ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञांच्या कार्याचा त्यांच्या कल्पनेप्रमाणे गोषवारा दिलेला आहे. हे पुस्तक अरबांकडून यूरोपात Almagest या नावाने आले. मध्ययुगात हेच ज्योतिषशास्त्राचे पाठ्यपुस्तक म्हणून गणले जात होते.  
 
त्याचे १३ खंड असून त्यात पुढीलप्रमाणे [[विषय]] आले आहेत. पहिल्या खंडात विश्वरचनेची भूमध्य कल्पना व पुरावे दिले आहेत. गोल परंतु स्थिर अशी पृथ्वी विश्वाच्या मध्याशी असून चंद्र, [[ग्रह]], सूर्य, तारे इ. तिच्याभोवती वर्तुळाकार कक्षांत फिरत असतात, हा टॉलेमी यांचा भूमध्य सिद्धांत होय. कोपर्निकस यांचा सूर्यमध्य सिद्धांत मांडला जाईपर्यंत सु. १,५०० वर्षे टॉलेमींचा सिद्धांतच सर्वमान्य होता.
 
दुसऱ्या खंडात भूमितीय जीवांचे (कॉर्डसचे) तक्ते, गोलीय त्रिकोणमिती व मेनलेअस प्रमेय तिसऱ्यात सूर्याची गती व वर्षाचा कालावधी चौथ्यात चंद्राची गती व महिन्याचा कालावधी आणि पाचव्यात तिसऱ्या व चौथ्यामधील काही बाबींची अधिक माहिती असून [[सूर्य]] व चंद्र यांची अंतरे यांचे विवेचन आणि सूर्य किंवा तारे यांची क्षितिजापासून कोनीय उंची मोजण्याचे ॲस्ट्रोलेब हे उपकरण तयार करण्याची माहिती दिलेली आहे. सहाव्या खंडात सूर्यचंद्राची [[ग्रहण|ग्रहणे]], ग्रहांच्या युति-प्रतियुतींची माहिती आहे.
 
सातव्या व आठव्या खंडांमध्ये स्थिर ताऱ्यांची माहिती, ⇨संपातचलनाविषयी चर्चा, ताऱ्यांच्या याद्या आणि खगोलाची प्रतिकृती तयार करण्याची पद्धती दिलेली आहे. ९ ते १३ या खंडांमध्ये ग्रहांची विविध माहिती व काही स्वतंत्र मौलिक संशोधनविषयक माहिती आलेली आहे.
 
त्यांच्या कार्याची व्याप्ती ज्योतिषशास्त्र, [[गणित]] आणि भूगोलशास्त्र या विषयांत असून त्याची थोडक्यात माहिती खाली दिली आहे.
 
ज्योतिषशास्त्र : हिपार्कस यांच्या ८५० ताऱ्‍यांच्या यादीवरून टॉलेमी यांनी उत्तर खगोलातील १,०२२ ताऱ्‍यांची यादी तयार केली. ती मध्ययुगात सर्वत्र उपयोगात आणली जात होती. ताऱ्‍यांच्या भासमान तेजस्वितेवरून त्यांनी ताऱ्‍यांची ६ प्रकारांत किंवा प्रतींमध्ये विभागणी केली होती. थोड्याफार फरकाने हे प्रकार सध्याही प्रचारात आहेत. ग्रहांचे भ्रमण ⇨अधिवृत्तात व अधिवृत्तांचे मध्य पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतात, या संकल्पनेचा उपयोग त्यांनी ग्रहमालेच्या उत्पत्तीच्या स्पष्टीकरणासाठी केला होता.
 
[[वर्ग: ग्रीक गणितज्ञ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/टॉलेमी" पासून हुडकले