"सायबर गुन्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ २:
{{विस्तार}}
'''सायबर गुन्हा भाग १ : - नवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे पहावे लागेल. आधुनिक काळात ही एक जागतिक समस्याच बनली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा गुन्ह्यांत महिला मोठ्या संख्येने बळी ठरलेल्या दिसतात. त्यांच्या संपूर्ण सुरक्षिततेलाच यामुळे धोका आहे. मात्र अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी कठोर कायदे करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटी ॲक्ट 2000 (माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000) हा कायदा आपल्याकडे करण्यात आला आहे. हॅकिंग, इंटरनेटवर अश्लिल गोष्टी किंवा मजकूराचे प्रकाशन इत्यादी गोष्टी कायद्याने गुन्हा मानण्यात आल्या आहेत. मात्र एकूणच महिलांच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेता हा कायदा परिपूर्ण नाही, असेच म्हणावे लागेल. लहान मुलांना यापासून वाचविण्यासाठी सेफ्टीवेब (सुरक्षित इंटरनेट जाळे) हे पालकांना सहाय्यकारी ठरत असते. आपण सायबर गुन्ह्याविषयी दोन भागात माहिती जाणून घेऊया…'''
'''सायबर गुन्हे - भाग १'''
 
=== '''महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे''' ===
'''एकूण सायबर गुन्ह्यांपैकी मोठ्या संख्येने गुन्हे हे केवळ महिलांच्याच बाबतीत घडत असतात. ते पुढीलप्रमाणे :'''
* '''ई-मेलद्वारे होणारा छळ'''
* '''सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)'''
* '''सायबर पॉर्नोग्राफी (सायबर विश्वातून पसरविली जात असलेली अश्लिलता)'''
* '''सायबर डीफमेशन (बदनामी)'''
* '''मॉर्फिंग (संगणकाच्या माध्यमातून इंटरनेटवरील मजकूरामध्ये किंवा छायाचित्रांमध्ये फेरफार करणे)'''
* '''ई-मेल स्फुफींग (ईमेलद्वारे होणारे विडंबन/टवाळी)'''
 
=== '''ई-मेलद्वारे होणारा छळ''' ===
'''पत्रांद्वारे दिल्या जाणाऱ्या त्रासाची ही पुढची पायरी म्हणावी लागेल. ब्लॅकमेल करणे, धमकावणे, दंडेली करणे किंवा फसवणूक करणे इत्यादी प्रकारांचा या पद्धतीच्या छळवणुकीत समावेश होतो. पत्रांद्वारे एखाद्याचा छळ करण्याप्रमाणेच हे आहे. मात्र बहुतेकवेळा बनावट खात्यांवरुनच असे ईमेल पाठविले जात असल्याने ते अधिक त्रासदायक असते.'''
 
=== '''सायबर स्टॉकिंग (Stalking) (सायबर विश्वातून होणारा पाठलाग)''' ===
'''आधुनिक काळातील हा सर्वाधिक चर्चित सायबर गुन्हा म्हणावा लागेल. यामध्ये सातत्याने एखाद्यावर लक्ष ठेवले जाते किंवा त्याचा पाठलाग केला जातो. एखाद्या व्यक्तीला सातत्याने मेसेजेस पाठविणे, ईमेल्स पाठविणे किंवा तो वापरत असलेल्या चॅटरुममध्ये प्रवेश करणे इत्यादी प्रकारांनी त्या व्यक्तीच्या इंटरनेटवरील सर्व हालचालींवर पाळत ठेवली जाते. यापैकी काही मेसेज धमकीचेही असतात. महिलांना पुरुषांकडून तर लहान मुलांना लैंगिक अत्याचाराची प्रवृत्ती असलेल्यांकडून अशा प्रकारच्या स्टॉकिंगला सामोरे जावे लागते. बहुतेकदा इंटरनेटच्या दुनियेत नवीन असलेल्या आणि इंटरनेट सुरक्षिततेची माहिती नसलेल्यांना याचा सामना करावा लागतो.'''
 
'''बहुतेक प्रकरणात महिला, मुले किंवा भावनिकदृष्ट्या कमजोर गुन्हेगारांचे बळी ठरतात. पण त्यातही 75 टक्क्यांपेक्षा जास्त महिलाच बळी ठरत असल्याचे मानले जाते. हे गुन्हे करण्यामागे चार प्रकारची कारणे किंवा मानसिकता असल्याचे दिसून येते. ज्यामध्ये लैंगिक छळ करण्याचा उद्देश, प्रेमात पछाडलेले असणे, बदल्याची किंवा द्वेषाची भावना आणि इगो यांचा समावेश आहे.वेबसाईटस, चॅट रुम्स, इंटरनेटवर असलेली चर्चा घडविणारी व्यासपीठे, ब्लॉग इत्यादी प्रकार आणि ईमेल या माध्यमांद्वारे गुन्हेगार आपल्या बळींना लक्ष्य करतात. मोफत उपलब्ध असलेले ई मेल्स तसेच चॅट रुम्स किंवा इतर व्यासपीठांवर उपलब्ध असलेले अनामिकत्व (जेथे तुम्ही तुमची खरी ओळख लपवून ठेवू शकता) यामुळे या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसते.'''
 
=== '''आपल्या देशातील सायबर स्टॉकिंगबाबतची वास्तविकता जाणून घेणाऱ्या काही प्रातिनिधिक घटना''' ===
'''सायबर गुन्हे - भाग 2'''
 
# '''महिलांना सामना करावा लागत असलेले सायबर गुन्हे'''