"रवी पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३६:
 
पटवर्धनांची आई नव्वदीपर्यंत ठणठणीत होती. नऊवारी नेसून बुलेटवर मागे बसून बिनधास्त फिरायची. तरुणपणी ती घोडेस्वारीसुद्धा करायची. तिची व्यायामाची आवड रवी पटवर्धन ह्यांच्यात उतरली.
 
"माझा मेंदू सोडून माझ्या सगळ्या अवयवांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.  मृत्यू अटळ आहे. पण मी मृत्यूला लांब उभे राहायला भाग पाडायचे ही माझी जिद्द आहे," असे म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी रवी पटवर्धन यांचे 6डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणायला ‘मृत्यू’ जिंकला, पण म्हणून रवी पटवर्धन यांची ‘जिद्द’ हरली नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते मृत्यूला झुंज देत राहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत सकारात्मक राहिले, हाच त्यांचा विजय.वयपरत्वे शारीरिक मर्यादा आल्यात, पण रवी पटवर्धन यांनी त्यांच्यापुढे हार मानली नाही. अखेरपर्यंत ते रंगभूमीची सेवा करत राहिले.
 
वयाच्या ८० व्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले.