"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
 
पुलं हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्सुमने आणि विनोदी किस्से आहेत.
 
=='पुलं'च्या भाषाप्रभुत्वावरील आणि हजरजबाबीचे एक उदाहरण==
सन १९६०च्या आसपास कधीतरी [[वसंत सबनीस]] यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती. त्यातील संवाद पहा :
 
[[वसंत सबनीस]] : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता, हीच वरात तुम्ही आता वाऱ्यावर सोडली आहे, हे खरे आहे का? असं वसंतराव म्हणाले!
 
पुलं : ''वाऱ्या'चीच गोष्ट काढली आहे म्हणून सांगतो...भावगीत गायक झालो तो काळ 'वारा फोफावला'चा होता.
 
''नट झालो नसतो तर 'वारा'वर जेवायची वेळ आली असती.
 
''शिक्षक झालो तेव्हा ध्येयवादाचा 'वारा' प्यायलो होतो.
 
''संगीत दिग्दर्शक झालो तेव्हा पेटीत 'वारा' भरून सूर काढत होतो.
 
''नाट्य दिग्दर्शक झालो तेव्हा बेकार 'आ-वारा' होतो.''प्राध्यापक झालो तेव्हा 'विद्वत्तेचा वारा' अंगावरून गेला होता.
 
''पटकथा लिहिल्या त्या 'वाऱ्या'वर उडून गेल्या.
 
''नुसताच साहित्यिक झालो असतो तर, कुणी 'वाऱ्याला'ही उभे राहिले नसते.
 
'' आणि ही सर्व सोंगे करताना फक्त एकच खबरदारी घेतली, ती म्हणजे 'कानात वारा' न शिरू देण्याची'
 
''आयुष्यात अनेक प्रकारच्या 'वाऱ्यांतून हिंडलो'. त्यांतून जे जिवंत कण डोळ्यात गेले, ते साठवले आणि त्यांचीत 'वरात' काढली.
 
''लोक हसतात... माझ्या डोळ्यांत आतल्याआत कृतज्ञतेचे पाणी येते, आणि म्हणूनच अंगाला 'अहंकाराचा वारा' लागत नाही. ''
 
---------
 
== जीवन ==