"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४७:
 
== मराठी भाषेतील ब्लॉग ==
इंटरनेटवर मराठी भाषेत लिखाण करणे शक्य झाल्यानंतर [[मराठी ब्लॉग]] दिसू लागले. आता मराठीत शेकडो [[ब्लॉग]] लिहिले जातात. २१ व्या शतकात माध्यमांचे स्वरूप पूर्णत: बदलले. माध्यमे, विशेषत: वृत्तपत्रे व्यावसायिक झाली. जी वृत्तपत्रे व्यावसायिकतेपासून दूर राहिली ती बंद पडली. दै. मराठवाडा हे याचे सर्वाधिक उत्तम उदाहरण होय. व्यावसायिक माध्यमांत वैचारिक आणि संशोधनात्मक लेखनाला कोणतेही स्थान राहिले नाही. त्यामुळे, एक मोठी पोकळी त्यातून निर्माण झाली. ही पोकळी ब्लॉग या नव्या माध्यमाने भरून काढली. २०१० सालापर्यंत मराठीतील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांना समांतर असा स्वतंत्र मीडिया ब्लॉगच्या रूपाने उभा राहिला. मराठीत शेकडो ब्लॉग लिहिले जातात. मेन स्ट्रीम मीडियापेक्षाही जास्त वाचकवर्ग ब्लॉगला आहे. मराठीतील अनेक नामांकित साहित्यिक संशोधक ब्लॉग लिहितात. पुरोगामी विचारांच्या ब्लॉगला वाचकांचा सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येते. तसेच ब्लॉगिंग शिकणार्यांसाठीही इथे मराठी भाषेत ब्लॉग उपलब्ध आहे. उदाहरणार्थ https://thankmelater.in/ हा ब्लॉग ब्लॉगर म्हणून कॅरिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आदर्श ब्लॉग आहे.
 
== मराठी ब्लॉगर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले