"परमहंसोपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Fixed the bogus file option lint error
छोNo edit summary
(Fixed the bogus file option lint error)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
[[File:Mute Swan Cape May RWD.jpg|thumb|Mute Swan Cape May RWD|alt=Mute Swan Cape May RWD.jpg|‘परमहंस’ या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ हंस असा होतो.]]
 
हे उपनिषद शुक्लयजुर्वेदीय आहे. या छोटेखानी उपनिषदात एकूण चार मंत्र आहेत. या उपनिषदात महामुनी नारदांनी भगवान ब्रह्माजींना परमहंस स्थितीबद्दल आणि मार्गाबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. त्यांची उत्तरे देताना भगवान ब्रह्माजींनी परमहंसाचे स्वरूप, त्याचा वेश-विन्यास, प्रमुख दीक्षा, त्याचा व्यवहार यांचे विस्ताराने वर्णन केलेले आहे. याविपरीत आचरण करणारास संन्यासाच्या नावावर कलंकस्वरूप सांगून तो घोर रौरव नरकात जाईल असे सांगितले आहे. परमहंसाने सोने आदि धन कोणत्याही स्थितीत आपल्याजवळ ठेवावयास नको; असे कुणी करत असेल तर तो ब्रह्महत्या, चांडाळ आणि आत्महत्या सदृश स्थितीमध्ये पोहोचतो. परमहंस तर आप्तकाम, कामनाशून्य, सुखदुःख-रागद्वेष-शुभाशुभ इत्यादींच्या पलीकडे गेलेला असतो. तो जितेंद्रिय, आत्मस्थ आणि पूर्णानंद पूर्णबोध स्वरूप असतो आणि हीच जीवनाची सर्वोच्च स्थिती आहे असे सांगितलेले आहे.