"विरामचिन्हे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विरामचिह्न: त्रुटी दूर केल्या.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
* प्रश्नचिह्न ( '''?''' ) : एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिह्न वापरतात. हे चिह्न वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
* एकेरी अवतरणचिह्न (‘…’) : एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिह्ने वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचिह्ने असतात. ही चिह्ने उलट-सुलट स्वल्पविरामांसारखी दिसतात.
* दुहेरी अवतरण चिह्न (“…”) : बोललेले वाक्यावाक्य मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी विराम चिह्न' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे."असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
* संयोग चिन्ह : जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पती-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
* 'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते. उदा० १). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच). २). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.