"मराठी प्रबंध सूची (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रास्ताविकात भर
ओळ १:
'''मराठी प्रबंध सूची''' ही महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध विद्यापीठांत सादर करण्यात येऊन मान्यता मिळालेल्या 'मराठीविषयक' प्रबंधाची सूची आहे. 'मराठीविषयक' ह्या संज्ञेने मराठी साहित्य, तौलनिक साहित्याभ्यास, भाषाविज्ञान आणि शिक्षणशास्त्र ह्या विषयांशी संबंधित अशा मराठी भाषेतील तसेच अन्य भाषांतील प्रबंधांचा निर्देश केलेला आहे.{{sfn|कुलकर्णी|२०११|पृ. आठ}} ह्या सूचीच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून त्यांत १९३८ ते २००७ {{sfn|कुलकर्णी|२०११|}} {{sfn|कुलकर्णी|२०१४|}} ह्या कालखंडातील प्रबंधांचा समावेश झालेला आहे.
 
डॉ. [[वसंत विष्णू कुळकर्णी]] हे १९८५ साली नागपूर विद्यापीठाच्या ग्रंथालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर मराठीच्या प्रेमापोटी मराठीतील प्रबंधसंपदा विद्यार्थी आणि संशोधकांच्या कार्यासाठी उपयोगी पडावी म्हणून सन १९८५ ते १९९१ पर्यंत शोधकार्य करून, त्यांनी प्रथम डी.लिट. आणि आचार्य पदवी मिळविणार्‍यांपासून तर १९९१ पर्यंतच्या मराठी विषयातील तब्बल ७५८ प्रबंधांची नावे, त्यातील विषय व संशोधनकारांच्या नावे असलेली '''मराठी प्रबंधसूची''' हे पुस्तक प्रकाशित केले.