"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संदर्भ: महात्मा गांधींच्या हत्यारा नारायण दत्तात्रय आपटे आहे. ( The Men Who Killed Gandhi by Manohar Malgonkar)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
{{गल्लत|हरी नारायण आपटे}} तसेच महात्मा गांधींच्या हत्येसाठी ज्याला मृत्युदंड देण्यात आला होता त्यांच्यासाठी तो नारायण दत्तात्रय आपटे आहे. ( The Men Who Killed Gandhi
by Manohar Malgonkar)
'''नारायण हरी आपटे''' (जन्म : समडोळी-सांगली जिल्हा, ११ जुलै १८८९; मृत्यू : कोरेगाव-सातारा, १४ नोव्हेंबर १९७१]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला
 
* २, ३ व ४ नोव्हेंबर १९६२ सातारा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
ओळ ५४:
या आधी नारायण हरी आपटे यांच्याच ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाची निर्मिती केली. सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिंदुस्थानात लोकप्रिय झाली होती. ‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत.
 
नारायण हरी आपटे यांच्याच ‘रजपूत रमणी’ कादंबरीवर प्रभातने ‘रजपूत रमणी’ (१९ ३६) चित्रपट तयार केला. यात मानसिंहाची भूमिका नानासाहेब फाटकांनी तर सौदामिनीची भूमिका नलिनी तर्खडने केली होती. केशवराव धायबरने दिग्दíशतदिग्दर्शित केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.
 
आपट्यांच्या लघुकथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली.
 
'''कुंकू''' हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे. [http://'http://www.rasik.com/marathi/best_books/sarvottam_maTA_pustake.html 'महाराष्ट्र टाईम्स'] आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कृष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली होती. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाईम्स'नेटाईम्सने स्वतःच केली होती. वाचकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन २७ पुस्तकांची या यादीत नंतर भर घालण्यात आली त्यात ‘न पटणारी गोष्ट’ ही कादंबरी निवडली गेली.
 
१९६२ सालच्या सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ना.ह. आपटे हे स्वागताध्यक्ष होते. अध्यक्ष बॅरिस्टर न.वि.गाडगीळ होते.