"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २:
'''दागिने''' म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर [[हिरा|हिरे]] बसवलेले असतांत.
==घडण==
सूचनेनुसार एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून [[धातू]] जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने [[साचा|साच्यातून]] [[दाब]] देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर [[ठसा]] उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. डाग दिल्यावर जो जाड भाग तयार होत जातो भाग म्हणजे बिरडे. बिरड्या म्हणजे अलंकराचे निर- निराळे पदर जेथें एकत्र करतात तें टोपण, जाड तुकडा. हे काहीवेळा गोल कडे स्वरूपात असू शकते. कधीकधी या कड्यावर एक धातूचा ठिपकाही असते. दागिने घडवताना [[सोने|सोन्याचा]] वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार [[मूस|मुशीत]] धातू ओतूनही तयार केले जातात. [[धातू]]वर नक्षीकाम तयार करणे ही एक [[कला]] आहे. यासाठी पूर्वी पारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम [[संगणक|संगणकावरही]] केले जाते. त्यासाठी [[कॅड]] (CAD) [[कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग]] या [[संगणक]] [[प्रणाली]]द्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी [[कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्‍चरिंग]] मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा [[मेण|मेणातही]] बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो.
==प्रकार==
दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले