"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९३ बाइट्स वगळले ,  १० महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
===संगीत===
गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी [[ग्वाल्हेर राजघराणे|ग्वाल्हेरला]] जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात [[बांदोडे]] या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, [[पेडणे]] महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
 
सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य [[रामकृष्णबुवा वझे]] यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.
[[चित्र:DSC00362.JPG|thumb|right|[[दिवाळी|दिवाळीतील]] नरक चतुर्दशीच्या दिवशी काढण्यात आलेल्या नरकासुराच्या मिरवणुकीतील एक दृश्य (स्थळः[[म्हापसा]])]]'गोवा''' हे [[भारत|भारतातील]] क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे छोटे ([[सिक्कीम]], [[मिझोरम]] व [[अरुणाचल प्रदेश]] या राज्यांनंतरचे) [[राज्य]] आहे. ते भारताच्या [[पश्चिम]] किनारपट्टीवर असून, त्याच्या [[उत्तर दिशा|उत्तरेला]] [[महाराष्ट्र]], [[पूर्व दिशा|पूर्व]] व [[दक्षिण दिशा|दक्षिणेला]] [[कर्नाटक]] ही राज्ये, तर [[पश्चिम दिशा|पश्चिमेला]] [[अरबी समुद्र]] आहे. [[मार्च ११]] [[इ.स. १९९३|१९९३]] रोजी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
 
गोव्याचे [[क्षेत्रफळ]] ३,७०२ चौ.किमी एवढे असून [[लोकसंख्या]] १४,५७,७२३ एवढी आहे. [[कोकणी]] व [[मराठी]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. तसेच [[शेती]] व [[मासेमारी]] हे गोव्यातील प्रमुख [[उद्योग]] आहेत. येथे प्रामुख्याने [[तांदूळ]] व [[कडधान्य]]ाचे पिक घेतले जाते. गोव्याची [[साक्षरता]] जास्त, म्हणजे ८७.०४ टक्के एवढी आहे. गोव्यात [[मॅगनीज]], [[लोह]] व [[बॅाक्साईट]] ही खनिजे आढळतात. गोवा हे प्राचीन मंदिरे व वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेबद्धलदेखील प्रख्यात आहे. बॅसिलिका ऑफ बॉम जीझस हे आशियातील सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रास्थळ गोव्यातच आहे. गोवा हे राज्य सह्याद्रीच्या कुशीत वसल्यामुळे गोव्यामध्ये भरपूर जैवविविधता आहे.
 
 
२८३

संपादने