"ऑस्ट्रिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५६:
'''ऑस्ट्रिया''' (अधिकृत नाव: [[जर्मन भाषा|जर्मन]]: Österreich, [[मराठी भाषा|मराठी]]: ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक) हा [[मध्य युरोप|मध्य युरोपातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. ह्याच्या उत्तरेस [[जर्मनी]] व [[चेक प्रजासत्ताक]], पूर्वेस [[स्लोव्हाकिया]] व [[हंगेरी]], दक्षिणेस [[स्लोव्हेनिया]] व [[इटली]] तर पश्चिमेस [[स्वित्झर्लंड]] व [[लिश्टनस्टाइन]] हे देश आहेत. [[व्हिएन्ना]] ही ऑस्ट्रियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. प्रामुख्याने [[आल्प्स]] पर्वतरांगेमध्ये वसलेल्या ऑस्ट्रियाचा मोठा भूभाग डोंगराळ स्वरुपाचा असून ६८ टक्के भूभाग समुद्रसपाटीहून ५०० मी व अधिक उंचीवर स्थित आहे. [[जर्मन]] ही ऑस्ट्रियाची राष्ट्रभाषा आहे.
 
ऐतिहासिक काळापासून युरोपाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचे स्थान असलेला ऑस्ट्रिया बहुतेक सर्व मोठ्या युद्धांना सामोरा गेला आहे. [[मध्य युग]]त [[पवित्र रोमन साम्राज्य]]चा भाग राहिलेल्या ऑस्ट्रियावर [[हाब्सबुर्ग राजघराणे|हाब्सबुर्ग राजघराण्याची]] सत्ता होती. [[प्रोटेस्टंट सुधारणा]]ंनंतर ऑस्ट्रियामध्ये [[प्रोटेस्टंट पंथ]] झपाट्याने लोकप्रिय झाला. [[तीस वर्षांचे युद्ध]] प्रमुख्याने मध्य युरोपातच लढले गेले. १७व्या व १८व्या शतकांदरम्यान ऑस्ट्रिया युरोपातील सर्वात बलाढ्य राष्ट्रांपैकी एक होता. १८०४ साली [[फ्रान्स]]मध्ये झालेल्या [[नेपोलियन]]च्या राज्याभिषेकाला शह देण्यासाठी [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ची स्थापना करण्यात आली. ह्याचदरम्यान जर्मनीमध्ये [[प्रशियाचे राजतंत्र]] देखील बलशाली बनले होते. जर्मन-भाषिक राष्ट्रांवरील वर्चस्वासाठी १८६६ साली [[ऑस्ट्रो-प्रशियन युद्ध]] झाले ज्यामध्ये प्रशियाचा विजय झाला. १८६७ साली ऑस्ट्रिया व [[हंगेरीचे राजतंत्र]] ह्यांनी [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] ह्या एकत्रित राष्ट्राची निर्मिती केली. ह्यानंतरच्या काळात [[जर्मन साम्राज्य]]ासोबत ऑस्ट्रियाचे सौदार्हाचे संबंध बनले. इ.स. १९१० च्या पूर्वार्धातील अत्यंत तणावपूर्ण वातावरणादरम्यानच १९१४ साली [[बोस्निया आणि हर्जगोविनाहर्जगोव्हिना]]ची राजधानी [[सारायेव्हो]] येथे [[ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड]] ह्याची हत्या केली गेली. ह्यामुळे खवळून उठलेल्या ऑस्ट्रियाने जर्मन साम्राज्याच्या चिथावणीखाली येऊन [[सर्बिया]]विरुद्ध युद्ध पुकारले ज्याचे रुपांतर झपाट्याने [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] झाले.
 
१९१८मधील पराभवानंतर पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला [[ॲडॉल्फ हिटलर]] १९३४ साली [[नाझी जर्मनी]]चा राष्ट्रप्रमुख बनला व १९३८ साली ऑस्ट्रिया जर्मनीमध्ये विलीन ([[आन्श्लुस]]) केले गेले. १९४५ साली [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] दुसऱ्या व सद्य ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा उदय झाला. आजच्या घडीला ऑस्ट्रिया जगातील सर्वात श्रीमंत व सुबत्त देशांपैकी एक मानला जातो.