"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''भगतसिंग कोश्यारी''' (जन्म: [[१७ जून]] [[इ.स. १९४२|१९४२]]) हे एक [[भारतीय]] राजकारणी व [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] विद्यमान [[राज्यपाल]] आहेत. ते मे १९९७मध्ये ते [[उत्तर प्रदेश]] राज्याच्या [[विधानपरिषद|विधानपरिषदेवर]] आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या [[उत्तराखंड]] राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी [[ऊर्जा]], पाटबंधारे, जलसिंचन, [[न्याय]] व [[विधिमंडळ]] कामकाज [[मंत्री]] झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे [[मुख्यमंत्री]] होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत [[ उत्तराखंड विधानसभा|उत्तराखंड विधानसभेचे]] विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या [[राज्यसभा| राज्यसभेचे]] सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते [[नैनीताल]]-[[उधमसिंह नगर जिल्हा|उधमसिंहनगर]]([[काशीपूर ]])[[लोकसभा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.<ref>{{स्रोत बातमी|title=कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला| दुवा=https://aajtak.intoday.in/story/bhagat-singh-koshyari-maharashtra-governor-uttarakhand-cm-bjp-leaders-rss-political-tpt-1-1136586.html|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|काम=aajtak.intoday.in|भाषा=hi}}</ref>भगतसिंग कोश्यारी यांची [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी]] जवळीक आहे. [[इंदिरा गांधी]] यांनी भारतावर लादलेल्या [[आणीबाणी]]ला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत कोश्यारींना तुरुंगवास भोगावा लागला. ५ [[सप्टेंबर]] २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली.<ref>{{स्रोत बातमी|title=कोण आहेत भगतसिंग कोश्यारी? महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-49543619|ॲक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019|दिनांक=12 नोव्हेंबर 2019}}</ref>
 
== अध्यन व अध्यापन ==