"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४४:
 
===बडोद्याचे दुसरे साहित्य संमेलन===
१९२१ सालच्या नोव्हेंबरमध्ये बडोद्यात दुसरे मराठी साहित्य संमेलन झाले. ते साहित्यसम्राट [[न.चिं. केळकर]] यांच्या अध्यक्षतेखाली राजमहालाच्या प्रांगणात भरले होते. [[न.चिं. केळकर]] यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी केसरीचे संपादक असलेल्या केळकरांनी [[कोल्हापूर]]चे शाहू महाराज आणि [[लोकमान्य टिळक]] यांच्यातल्या वादासंदर्भात २१ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शाहू महाराजांच्या विरोधात लेखन केले होते, त्यामुळे संतापलेल्या काही लोकांनी शाहू महाराज हे सयाजीराव महाराजांचे व्याही असल्याचे कारण पुढे करत केळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती.
 
केळकरांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसेच हा प्रस्ताव फेटाळून लावला.
 
या मराठी संमेलनाच्या साहित्य दिंडीत लेझीम पथक, मल्लखांब आणि लष्करी परेड होती. या परेडमध्ये पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.
[[न. चिं. केळकर]] यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केले. भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीने उठून जायचे नाही, अशी अट त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच घातली होती.
 
[[न. चिं. केळकर]] यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केले. भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीने उठून जायचे नाही, अशी अट त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच घातली होती.
 
हे ११वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले