"गोवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६२० बाइट्सची भर घातली ,  १० महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
===संगीत===
गोव्याच्या जवळच्या मालवण येथील विठोबा अण्णा हडप यांनी [[ग्वाल्हेर राजघराणे|ग्वाल्हेरला]] जाऊन शास्त्रीय संगीताची साधना केली. या संगीत विद्येच्या प्रसारासाठी देशभ्रमण करून अखेरीस ते गोव्यात [[बांदोडे]] या गावी आले. या गावात राहून त्यांनी अनेकांना शास्त्रीय संगीताची तालीम दिली. विठोबा अण्णांच्या शिष्या सरस्वतीबाई बांदोडकर या गोमंतकातील पहिल्या शास्त्रीय संगीत शिकलेल्या स्त्री कलावंत. सरस्वतीबाईंनंतर शाणेबाई रामनाथकर, [[पेडणे]] महालातील जयाबाई, जनाबाई, धृपद गायनात लौकिक मिळवलेल्या जनाबाईंच्या बहिणी कल्याण व शहाणी या सर्व विठोंबाच्या शिष्या होत. विठोबा अण्णांनंतर ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेऊन गवई अनंतबुवा आले. त्यांनी रामुबाई कपिलेश्वरींना शिकवले. त्यानंतर गोव्यात ख्याल गायकी प्रचारात आणली ती [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] यांचे शिष्य दत्तुबुवा भिडे यांनी. १९६१ मध्ये भारताने गोवा मुक्त करेपर्यंत सुमारे ४५० वर्षांच्या दीर्घ कालावधीकरिता गोव्यावर पोर्तुगीजांचा अंमल राहिला. निसर्गसौंदर्याबद्धल प्रसिद्ध असलेल्या समुद्रकिना-यांमुळे गोवा हे देशी, परदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून पर्यटन हा येथील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे.
 
सन १८७० च्या सुमारास गायनाचार्य [[रामकृष्णबुवा वझे]] यांचे गोव्यात आगमन झाले. त्यांनी दीनानाथांसह अनेकांना संगीताची दीक्षा दिली.
 
==बाह्यदुवे==
* [http://www.marathimati.com/balmitra/general-knowledge/old-goa/   जुना गोवा]
[https://pravasmitra.com/goa-tourist-places-in-marathi/ गोवा पर्यटन स्थळे]
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
२८३

संपादने