"लक्ष्मी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
लक्ष्मीला “श्री” म्हणजे “समृद्धी” “आनंद”, “वैभव” असे म्हटले जाते; लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/lokprabha/laxmi-poojan-2-1031988/|title=श्रीलक्ष्मी : मातृदेवता लक्ष्मी|दिनांक=2014-11-26|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-09-21}}</ref>
 
[[दिवाळी]] मध्ये आश्विन अमावास्येला प्रदोषकाळी (संध्याकाळी) [[लक्ष्मीपूजन]] करतात. या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, [[कुबेर]], गणेशाची तसेच धनलक्ष्मी प्राप्तीसाठी [[श्रीयंत्र]] वा श्रीचक्र, [[शंख]] याची स्थापना करून पूजा करतात. दीपोत्सव भारतात आणि जगभरात साजरा होतो. या सणाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावतात. घराबाहेर विविधरंगी रांगोळी काढतात. [[स्वस्तिक]], [[गोपद्म]], [[कमळ]], [[शंख]], [[चक्र]], [[पूर्णचन्द्राचीचे कला]] ([[पौर्णिमा]]), लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत. ही मंगलचिन्हे दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवतात.
 
लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.<ref name=":1">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://avhadswapnil7.blogspot.com/2018/03/blog-post_25.html|title=लेख: आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.|संकेतस्थळ=लेख|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://marathi.webdunia.com/deepawali-marathi/लक्ष्मीपूजन-आश्‍विन-अमावास्या-110110100022_1.html|title=लक्ष्मीपूजन (आश्‍विन अमावास्या)|last=वेबदुनिया|संकेतस्थळ=marathi.webdunia.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-09-17}}</ref> दिवाळीत घरोघरी फराळ बनवतात व शेजाऱ्या घरी पोचता करतात.
 
[[पश्चिम बंगाल]], [[ओरिसा]] आणि [[आसाम]]मध्ये लक्ष्मी देवी बरोबर वाहन [[घुबड]] (उल्लीक) याचीही पूजा होते.
 
<br />
 
=='''प्रतीकशास्त्र आणि व्युपत्तीशास्त्र'''==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/लक्ष्मी" पासून हुडकले