"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३१:
== ऐतिहासिक सासवड ==
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी [[कऱ्हा]]माई व [[भोगावती]] ([[चांबळी]]) यांच्या पवित्र संगमाच्या [[उत्तर]] तीरावर वसलेली आहे.<br /><br /> शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीची खिंड, बोपदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट, [[दिवे घाट]], शिंदवणेघाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणुरेणूतही तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषांमधून मिळते. यामध्ये '''[[भैरोबा मंदिर]], [[सोपानदेव|सोपानदेवांची]] समाधी, [[संगमेश्वर]] मंदिर
'''भैरोबा मंदिर :''' हे गावातील एक पुरातन मंदिर आहे. याला सुंदर तटबंदी आहे. मंदिर कऱ्हा नदीजवळ असून मंदिरात जाण्यासाठी १०-१२ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या दाराजवळ जय-विजय यांच्या मुर्त्या आहेत. दारातून आत जाताच उजव्या हाताला नगारखाना आहे. सणासुदीला हा वाजवला जातो. भैरोबाखेरीज येथे [[विष्णू]]च्या दशावतारांचे देखील दर्शन घडते. मंदिराच्या आतील भिंतींवर [[रामायण]], [[महाभारत]], [[शिवचरित्र]] आदींमधील चित्रे रेखाटली आहेत.
|