"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1732808 by 2402:8100:3095:2980:D031:900B:91F7:6ED9 on 2020-01-26T17:43:22Z
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
 
== ऐतिहासिक सासवड ==
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई[[कऱ्हा]]माई[[भोगावती]] (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या [[उत्तर]] तीरावर वसलेली आहे.<br /><br /> शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे हे जहागिरीतील गाव. [[साबगरखिंड]], [[पांगारखिंड]], पानवडीचीखिंड[[पानवडीची खिंड]], [[बोपदेव घाट]], [[पुरंदर घाट]], [[भुलेश्वरघाट]], [[दिवे घाट]], [[शिंदवणेघाट]] इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणुरेणूतही तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषांमधून मिळते. यामध्ये '''[[भैरोबा मंदिर]], [[सोपानदेव|सोपानदेवांची]] समाधी, [[संगमेश्वर मंदिर]], [[चांगावटेश्वर मंदिर]], [[कऱ्हाबाई मंदिर]]''' आदी ठिकाणे येतात. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.
 
'''भैरोबा मंदिर :''' हे गावातील एक पुरातन मंदिर आहे. याला सुंदर तटबंदी आहे.  मंदिर कऱ्हा नदीजवळ असून मंदिरात जाण्यासाठी १०-१२ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या दाराजवळ जय-विजय यांच्या मुर्त्या आहेत. दारातून आत जाताच उजव्या हाताला नगारखाना आहे. सणासुदीला हा वाजवला जातो.  भैरोबाखेरीज येथे विष्णूच्या[[विष्णू]]च्या दशावतारांचे देखील दर्शन घडते. मंदिराच्या आतील भिंतींवर [[रामायण]], [[महाभारत]], [[शिवचरित्र]] आदींमधील चित्रे रेखाटली आहेत.
 
'''सोपानदेवांची समाधी :''' [[ संत ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांचे]] धाकटे बंधू 'संत सोपानदेव' यांची समाधी सासवड येथे आहे. मंदिरात जाण्यासाठी सासवड गावातून रस्ता आहे.  हेही मंदिर कऱ्हा नदीतीरी असून मंदिरात जाण्यासाठी १०-१५ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिरात प्रवेश करताच समोर सिद्धेश्वराचे ([[शिवमंदिर]]) मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात बारा ज्योतिर्लिंगांची सुंदर चित्रे होती. या मंदिराच्या बरोबर मागे सोपानदेव महाराजांचे समाधी स्थळ आहे. मंदिराच्या सभागृहात ६-६.५ फूट उंच अशी मारुतीरायाची मूर्ती आहे. या मूर्तीसमोर अखंड वीणावादन सुरु असते.  समाधीस्थळी चौथरा असून त्यावर पितळेचा सुंदर मुखवटा आहे. गाभाऱ्यात [[विठ्ठल]]-[[रुख्मिणी]] आणि [[राम]]-[[लक्ष्मण]]-[[सीता]] आणि [[मारुती]] यांच्यादेखील सुंदर मूर्ती आहे. समाधीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी बाहेर आल्यावर दत्त मंदिर लागते. त्या छोटेखानी मंदिरातील दत्त मूर्तीही देहभान विसरावे अशी सुंदर आहे. तेथून पुढे आल्यावर एका विशाल चिंचेच्या वृक्षाचे दर्शन घडते. या वृक्षाखालूनच समाधीस्थळी सोपानदेव महाराजांनी प्रस्थान केले होते. मंदिराबाहेर आल्यावर उजव्या हाताला नदीपात्रात एक सुंदर कुंड आहे. ते कधीही आटत नाही असे म्हणतात. या कुंडात असलेली गणेशमूर्ती आवर्जून पहावी.
 
[[पुरंदर]] तालुक्याचे ठिकाण असलेले हे गाव व परिसर वैभवी असाच आहे.
मराठयाचा इतिहासाच्या कालखंड मधील पुरंदर चापुरंदरचा किल्ला हा महत्वाचा किल्ला म्हून ओळखला जातो शिवाजी महाराजाचा पुरंदरचा तहयच्च झाला होता छत्रपती संभाजी महाराजायांचा जन्म याच पुरंदर किल्लावर झाला होता.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले