"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
 
== जीवन ==
साने गुरुजींचा जन्म कोकणातील [[रत्‍नागिरी]] जिल्ह्यातील [[पालगड]] या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी [[इंग्रजी]] साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
 
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी [[जळगाव]] जिल्ह्यातील [[अंमळनेर]] येथील [[प्रताप हायस्कूल]] येथे [[शिक्षक]] म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, [[सेवावृत्ती]] शिकवली. अंमळनेर येथील [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
 
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर [[महात्मा गांधीं|महात्मा गांधींच्या]] विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून [[सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत]] भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. [[जळगाव]] जिल्ह्यातील [[फैजपूर]] येथील कॉंग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत [[भूमिगत]] राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
ओळ ४७:
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे<br />
 
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील [[एस.एम. जोशी]], [[ग.प्र. प्रधान]], दादा गुजर, [[ना.ग. गोरे]], प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, [[मधु दंडवते]], [[यदुनाथ थत्ते]], रा.ग. जाधव,[[राजा मंगळवेढेकर]], वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.
 
==आंतरभारती==