"मेहकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३५० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
 
==इतर महत्त्वाचे==
संपूर्ण मराठी साहित्य जगतात प्रख्यात झालेले कविवर्य ना. घ. देशपांडे मेहकरचे. त्यांच्या शीळ, अभिसार, खूणगाठी या काव्यसंग्रहांतील कवितांनी रसिकांना वेड लावले होते. राज्य पुरस्कारांपासून साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. मेहकरच्या उत्तरेला टेकडीवर असलेल्या पुरातन कंचनीच्या महालासंबंधीच्या आख्यायिकेवर ‘कंचनीचा महाल’ हे दीर्घकाव्य त्यांनी लिहिले. त्याचा स्वतंत्र संग्रह निघाला. सांस्कृतिक क्षेत्रात मात्र मेहकरात मोठी पोकळी निर्माण झाली होती. १९९५ पासून मात्र किरण शिवहर डोंगरदिवे ह्यांनी ही पोकळी भरून काढत संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या साहित्यमुळे मेहकरची साहित्य चमक दाखवली. १९७६ मध्ये जन्मलेल्या ह्या साहित्यिक शिक्षकास राज्य पुरस्कारसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत . त्यांच्या तुटलेल्या बोटांचे संदर्भ, मृगजळाचे पाणी आणि विषात वितळलेले सत्य ह्या संग्रहाना विशेष मागणी असून हे संग्रह खुप गाजले.किरण डोंगरदिवे ह्याच्या समीक्षण क्षेत्रात काव्यप्रदेशातील स्त्री ह्या दीर्घ ग्रंथाला महाराष्ट्रभरातून प्रचंड लोकप्रियता लाभली. ना.घं. देशपांडे यांचे बंधू वि.घ. देशपांडे हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. ते खासदारही होते. १९३९ मध्ये त्यांचा सत्कार मेहकरच्या बालाजी मंदिरात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावकरांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी सावरकरांनी युवकांना मोठय़ा संख्येने सैन्यात भरती होण्याचे आवाहन भाषणातून केल्याची नोंद आहे.<br/>
ना.घं. देशपांडे यांनी मेहकरात मेहकर एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था स्थापन केली. त्या संस्थेचे महाविद्यालय, विद्यालय व कन्या विद्यालय आहे. खासदार प्रतापराव जाधव यांनी महिला महाविद्यालय, विद्यालय व कॉन्व्हेंट सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकरात आणले. श्याम उमाळकर यांनी अध्यापक महाविद्यालय, संगणक महाविद्यालय, फार्मसी विद्यालय, मॅनेजमेंट अभ्यासक्रम महाविद्यालय स्थापन केले. डॉ. सुभाष लोहिया यांनी महेश विद्या मंदिर, या इंग्रजी शाळेची भरीव प्रगती केली.डॉ. राम शिंदे यांनीही शैक्षणिक क्षेत्रात चांगली वाटचाल सुरू केली आहे,अध्यापक विद्यालय, पॉलिटेक्निक, CBSE पब्लिक स्कूल या संस्थाही त्यांनी सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केली. संतांजी कॉन्व्हेंट, ज्ञानदीप कॉन्व्हेंट या इंग्रजी शाळा लक्षणीय कार्य शैक्षणिक क्षेत्रात करीत आहेत. कासमभाई गवळी यांनी उर्दू विद्यार्थ्यांसाठी उर्दू विद्यालय सुरू केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातली मेहकरची घोडदौड नजरेत भरण्यासारखी आहे.
 
अनामिक सदस्य