"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ११२:
 
 
अलेक्झांडरच्या पर्शियावरील स्वारीचा प्रमुख उद्देश पर्शियाच्या अकिमेनिड साम्राज्याच्या तावडीतून ग्रीक शहरांची सुटका करणे आणि त्यावर ग्रीक अंमल बसवणे हा होता. ग्रेनायकसच्या लढाईनंतर त्याने त्या प्रदेशावर आपला मांडलिक राज्यपाल नेमला. यानंतर अलेक्झांडरने आपला मोर्चा [[सार्डिस]], [[करिया]] आणि इतर समुद्रतटाजवळील शहरांकडे वळवला आणि ही शहरे आपल्या ताब्यात घेऊन त्यावर ग्रीक शासन बसवले. तेथून त्याने आपली सेना [[लिसिया]] आणि [[पॅम्फेलिया]] या महत्त्वाच्या बंदरांकडे वळवली. हे प्रदेश ताब्यात घेतल्यावर त्याने [[निअर्कस]] या आपल्या मित्राला या प्रदेशाच्या राज्यपालपदी नेमले. समुद्रतटाजवळ इतर कोणतीही शहरे न उरल्याने अलेक्झांडरने आपला हल्ल्याची दिशा पर्शियाच्या मुख्य भूमीकडे वळवली.
 
[[दरायस तिसरा]] याच्याशी युद्ध लढायचे झाल्यास [[फर्जिया]]चे पठार हा उपयुक्त प्रदेश होता. घोडदळाच्या लढाईसाठी उत्तम अशी सपाट, पिकाऊ जमीन आणि पाणी [[मॅसेडोनिया]]च्या सैन्याच्या गरजा भागवण्यास पुरेसे होते. अलेक्झांडरने आपले सैन्य दोन गटांत विभागले. अर्धे सैन्य पार्मेनियनच्या नेतृत्वाखाली पश्चिमेकडून सार्डिसच्या दिशेने आत घुसले तर अलेक्झांडरच्या नेतृत्वाखालील सैन्य पॅम्फेलियाकडून उत्तरेला वळले. या दोन्ही सैन्यांनी वाटेत लागणार्‍या लहान मोठ्या शहरांचा पाडाव केला आणि हे दोन्ही गट फर्जियाची राजधानी [[गॉर्डियम| गॉर्डियन]] येथे एकमेकांना मिळाले. आख्यायिकेनुसार येथेच अलेक्झांडरने '[[गॉर्डियन गाठ]]' सोडवली. ही गाठ सोडवणारा आशियाचा सम्राट बनेल असे भाकित वर्तवण्यात आले होते. [[ऍंटिगोनस]]ला फर्जियाचा राज्यपाल नेमून अलेक्झांडरने आपले सैन्य [[अंकारा]]च्या मार्गावरून [[सिलिसियाचे द्वार | सिलिसियाच्या द्वारापाशी]] आणले. आतापर्यंत अलेक्झांडरच्या सैन्याने सपाट पठारावरून वाटचाल केली होती. सिलिसियाच्या खिंडीत आपल्यावर छुपे हल्ले होतील या भीतीने अलेक्झांडरने आपल्या सैन्याला केवळ रात्री पुढे सरकण्याची आज्ञा दिली. सिलिसियाची राजधानी टॉर्सस येथे पोहोचेपर्यंत अलेक्झांडरला फारसा प्रतिकार झाला नाही. टॉर्सस ताब्यात घेऊन अलेक्झांडरने इ.स.पूर्व ३३३ सालातील ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात या शहरात आपल्या सैन्याची छावणी ठेवली.