"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २३१:
 
अलेक्झांडरच्या मृत्यूपश्चात त्याच्या राज्याला उत्तराधिकारी निवडला गेला नसल्याने त्याच्या राज्याची विभागणी कशी करायची याबाबत त्याच्या महत्त्वाच्या सेनापतींमध्ये एकवाक्यता झाली नाही. अलेक्झांडरच्या पश्चात त्याचा एक सावत्र भाऊ अरिडिअस, बर्सिन या दासीपासून झालेला पुत्र हेरॅक्लीस आणि रॉक्सेनच्या गर्भातील अंकुर या सर्वांचा राज्यावर दावा होता. अलेक्झांडरची दुसरी पत्नी आणि दरायस पुत्री स्टटेरा हिचा खून करण्यात आला. निअर्कस, पेर्डिक्कस, टोलेमी आणि इतर सेनापती यांचे राज्याचा उत्तराधिकारी कोण असावा या वादावर एकमत होईना. त्यातून पुढे अंतर्गत युद्धपरिस्थिती निर्माण झाली.
 
या वादातून पुढे अरिडिअस, आणि काही काळाने रॉक्सेन आणि अलेक्झांडरचा पुत्र अलेक्झांडर चौथा यांचे खून करण्यात आले.
 
अलेक्झांडरच्या राज्याचे पुढीलप्रमाणे भाग झाले: